🛑डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा शाखेची तालुका कार्यकारणी जाहीर.
🛑छत्रपती शिवाजी महाराजांच्या बददल चुकीची वक्तव्ये करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा.- मराठा महासंघ.
राधानगरी – प्रतिनिधी.
![](http://sahyadrinewsmarathi.com/wp-content/uploads/2025/02/IMG_20250209_090016-1024x804.jpg)
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कागल,भुदरगड आणि राधानगरी तालुका कार्यकारणी बैठक आज शिवाजीराव खोराटे विद्यालय व जुनिअर कॉलेज सरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राधानगरी तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष कृष्णात लाड, सचिव बाजीराव मोरे, खजिनदार संजय किरुळकर, संपर्कप्रमुख आकाश पाटील तर राधानगरी तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी निलोप्रभा जाधव .
कागल तालुका अध्यक्षपदी ओंकार पोतदार, उपाध्यक्ष अक्षय घोडके, सचिव अभिजीत वंडकर, सहसचिव विवेक पोतदार, संपर्कप्रमुख ज्योतीराम कुंभार तर
भुदरगड तालुका.अध्यक्षपदी राजेंद्र दबडे, भुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी रोहिणी साळुंखे-चव्हाण यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून टी एम सरदेसाई, तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी महेश पाटील यांची निवड कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसो फासके, उपाध्यक्ष दीपक मांगले, सहसचिव इंद्रजीत मराठे, महिला आघाडी जिल्हा जिल्हाध्यक्षा सायली मराठे, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष भाऊसो फासके यांनी बदलत्या युगात डिजिटल मीडियाचे महत्व व गरज त्याचबरोबर या क्षेत्रात काम करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी याविषयी मार्गदर्शन केले व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे वाटचालीचा आढावा व सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली. यावेळी बोलताना
उपाध्यक्ष दीपक मांगले यांनी डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी लवकरच कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने व राज्य संघटनेच्या मान्यतेने गडहिंग्लज येथे डिजिटल कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव इंद्रजीत मराठे यांनी केले, प्रस्ताविक पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे तर आभार महेश पाटील यांनी मानले. यावेळी तिन्ही तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
![](http://sahyadrinewsmarathi.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250204-WA0031-781x1024.jpg)
🛑छत्रपती शिवाजी महाराजांच्या बददल चुकीची वक्तव्ये करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा.- मराठा महासंघ.
आजरा.- प्रतिनिधी.
![](http://sahyadrinewsmarathi.com/wp-content/uploads/2025/02/IMG_20250208_163604.jpg)
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि भारत देशाचे आराध्य दैवत आहे. महाराजांनी बारा बलेतुदार व अठरा पगड जातीचे रयतेचे राज्य स्थापन केले. त्यामुळेच ते सर्व धर्मियांचे बध्दास्थान आहे.
राहुल सोलापूरकर यांनी शिवचरित्रा विषयी वादग्रस्त वक्तव्य करताना बोलण्यातील बेरकी इस करुन लोकांना अनिष्ट करण्याचे उद्योग बंद करावे. व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोणी चित्रपट सृष्टीत कलाकार झाले म्हणजे इतिहास संशोधक होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे स्वाभिमान, अभिमान आणि अध्यास्थान आहे. परंतु शिववरित्र विषयी कोणताही अभ्यास नसताना जणू इतिहासाचा गाढा अभ्यासक आहोत या अधिभर्भावात राहुल सोलापूरकर हैर शिवचरित्राविषयी बरगळत असून शिवभक्तांच्या भावनेला वैद्य पोहचवत आहेत.
आग्याहून सुटका हि शिवरायांच्या जीवनातील नाटयपूर्ण, बलादय व कुर औरंगजेबाला जेरीस आणणारी ऐतिहासिक घटना आहे. याविषयी अनेक समकालीन बखरी व राजस्थान कागदपत्रांचा व नोंदीचा जेष्ठ इतिहासकारांनी अभ्यास केला आहे. असे असताना सवंग विधाने करून चूकीचा इतिहास मांडण्याचा पायंडा पाडत असून जश्या खोटया इतिहास मांडणीमुळे शिवभक्तांच्या भावनेचा उद्रेक होत आहे.
अशा व्यक्ती आणि प्रवृतीना ठेचण्याची वेळ आली आहे व्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबददल चुकीची वक्तव्य करणाच्या राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करणेची मागणी आम्ही या निवेदनाव्दारे करीत आहोत तसेच त्यांनी शिवभक्तांची तातडीने माफी मागावी अन्यथा त्याचा कोल्हापूरी पावतीने योग्य समाचार घेतला जाईल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी मराठा महासंघाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.