🛑दिल्लीत भाजपची मुसंडी.- २७ वर्षांनी भाजप सत्तेच्या जवळ.- ‘आप’ला मोठा धक्का.
🛑दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव.- दिल्ली निवडणुकीत ‘आप’ला मोठा झटका..
🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास बोगस चेक देणा-यास शिक्षा. ( आकरा लाख रुपये.- नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्यांत अदा.. करण्याचे मा. न्यायालयाच्या आदेश. )
🛑निर्दयी मातेने पोटच्या दोन चिमुकल्यांचा साखरझोपेत गळा आवळला.- जिने जन्म दिला तिनेच चिमुकल्यांना संपवलं.- पतीवरही कोयत्याने केले वार.
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) पिछाडीवर पडला आहे. भाजप सत्तेच्या दिशेने आगेकूच करत आहे. दिल्लीत भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजपाने 47 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 23 जागांवर पुढे आहे. काँग्रेसच्या खात्यात एकही मत गेलेले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार असल्याचे कलावरून स्पष्ट होत आहे. आम आदमी पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘आप’च्या दिल्लीतील मक्तेदारीला शह दिल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात भाजपने विधानसभा निवडणुकीत कमबॅक केल्याचे दिसून आले. भाजपने दिल्लीत गेल्या महिनाभरात प्रचंड आक्रमक प्रचार केला.
दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. ओखला मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या अमानतुल्लाह खान यांनी ओखला मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या अरीबा खान आणि भाजपचे मनीष चौधरी पिछाडीवर आहेत. दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलं आहे की,जनता भाजपबरोबर आहे. देशाने यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून स्वीकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
🟥दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव.- दिल्ली निवडणुकीत ‘आप’ला मोठा झटका
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
![](http://sahyadrinewsmarathi.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250208-WA0074.jpg)
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.
प्रवेश वर्मा हे भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देखील असल्याची माहिती आहे. आपचे माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचादेखील पराभव झालाय. त्यांच्यापाठोपाठ आता अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या पराभवासह त्यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. निवडणुकीत आपचा पराभव झाला तर आपण पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊ, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. भाजपने 45 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारल्याने आप आता सत्तेबाहेर जाणार असल्याचं स्पष्ट आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज मतमोजणी पार पडत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आप पक्षापेक्षा जास्त आघाडीवर दिसत आहे. भाजपने या निवडणुकीत तसं वातावरण देखील निर्माण केलं होतं. भाजपने या निवडणुकीत प्रचंड ताकद लावली होती. तसेच घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. परिणामी, आता दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. कारण भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळताना दिसतोय.
विशेष म्हणजे आम आदमी पक्षाच्या दिग्गजांना जनता आता घरी पाठवताना दिसतेय. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव झाल्याची माहिती आधी समोर आली. मनिष सिसोदिया यांचा 1200 मतांनी पराभव झाला. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मिश्रा या देखील सातत्याने पिछाडीवर जाताना दिसत होत्या. अखेर अटीतटीच्या लढतीत त्यांचा विजय झाला आहे.
🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास बोगस चेक देणा-यास शिक्षा. ( आकरा लाख रुपये.- नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्यांत अदा.. करण्याचे मा. न्यायालयाच्या आदेश. )
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास सन २०१६/१७ या गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा पुरविणेसाठी घेतलेल्या अॅडव्हान्स रक्कमेतील थकीत रक्कमेच्या फेडीपोटी भुदरगड तालुक्यातील युवराज मारूती ढेकळे, रा. टिक्केवाडी यांनी कारखान्यास सन २०२१ मध्ये थकीत रक्कम फेडण्यासाठी रू.८,००,०००/- इतक्या रक्कमेचा चेक दिला होता. सदरचा चेक न वटलेने त्यांचे विरुध्द मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, आजरा यांचे कोर्टात फिर्याद दाखल केली होती. सदर केस मे. न्यायालयासमोर चालून त्यावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा आर.पी.थोरे यांनी आरोपींला तीन महिने कैदेची शिक्षा व रु.११,००,००० /- (अक्षरी रू. आकरा लाख) इतकी रक्कम फिर्यादी साखर कारखान्यास नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्याचे आत आदा करावी असा आदेश केला आहे. फिर्यादी कारखान्याचेवतीने वकिल म्हणून अॅड.बी.के. देसाई यांनी काम पाहिले तर फिर्यादी म्हणून श्री. अनिल देसाई यांनी फिर्याद दाखल केली होती व राजकुमार कदम, लिगल क्लार्क यांनी जाबजबाब दिले.
सद्या महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यामध्ये तोडणी वाहतुक कंत्राटदारांच्याकडून अॅडव्हान्स रक्कमा उचल करून कारखान्यास फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. अशी फसवणुक होवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाकडून देखील वेगवेगळे पर्याय अवलंबिले जात आहेत. आजरा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्याकडे थकबाकी असलेल्या व कारखान्यास चेक दिलेने मे. कोर्टात केसीस सुरू असलेल्या कंत्राटदारांना व्याजात सवलती देवून रक्कमा भरूण घेणेचे सवलतीचे धोरण अवलंबिले आहे. कारखान्याशी संपर्क साधुन या धोरणाचा लाभ संबंधीत कंत्राटदारांनी घ्यावा व कायदेशिर कारवाई सारखे कटु प्रसंग टाळावेत असे अवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी केले आहे. यावेळी व्हा.चेअरमन एम.के.देसाई, सर्व संचालक मंडळ सदस्य आणि प्र. कार्यकारी संचालक.व्ही. के. ज्योती उपस्थित होते.
🛑निर्दयी मातेने पोटच्या दोन चिमुकल्यांचा साखरझोपेत गळा आवळला.- जिने जन्म दिला तिनेच चिमुकल्यांना संपवलं.- पतीवरही कोयत्याने केले वार
पुणे :- प्रतिनिधी.
घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. कोमल दुर्योधन मिंढे (वय, 30) असे या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
🟥शंभू दुर्योधन मिढे (वय ०१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ०३ वर्ष) अशी मयत मुलांची नावं आहेत. तर, दुर्योधन आबासाहेब मिढे (वय 35 वर्ष) असं जखमी पतीचं नाव आहे. शनिनारी पहाटेच्या सुमारास शंभू आणि पियू ही दोन्ही चिमुरडी पोरं झोपलेली होती. यादरम्यान मुलं साखर झोपेत असतानाच कोमलने त्यांचा जीव घेतला.
ज्या पोरांना तिने जन्माला घातलं, आपल्या हातांनी त्यांनी वाढवलं त्याच हातांनी गळा आवळून तिने दोन्ही पोरांची हत्या केली. ती इतक्यावरच थांबली नाही तर त्यानंतर तिने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले. तिने पतीच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला कंटाळून कोमलने हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.