माझा पराभव करण्यासाठी जातीवादाचा मुद्दा विरोधकांनी पुढे केला.- नाम. हसन मुश्रीफ
( मडिलगे येथे नाम. हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार उत्साहात संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.
माझा पराभव करण्यासाठी जातीवादाचा मुद्दा विरोधकांनी पुढे केला व मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न झाले तरीही मला मतदारांनी विजयी केले नाम. हसन मुश्रीफ मडिलगे येथे विविध संस्था, संघटना, ग्रामस्थ यांच्या नागरी सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रास्ताविक सरपंच बापू निऊगरे यांनी केले. पुढे बोलताना नाम. मुश्रीफ म्हणाले मतदारसंघातील नागरिकांना अनेक योजनेचे लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिले आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला. यामध्ये सध्या नवीन लाभार्थी व लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे
यासाठी नवीन केंद्र स्थापन करण्यात येतील कोल्हापूर येथे प्रमिला राजे रुग्णालय हे फार जुने झाले असून यासाठी 50 कोटीचा निधी लावण्यात आलेला आहे तर शेंडा पार्क मध्ये अकराशे बेड हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे. याचे काम चालू होईल काम करायचे ठरवले तर खूप काही करता येत कागल येथे योगा व निसर्गोपचार हॉस्पिटल तसेच संजय गांधी योजनेचे लाभ मोफत ऑपरेशन जिल्हा बँकेचा तोटा कमी करून थकबाकीदार समोर जाऊन थकबाकी वसूल करून राज्यात बँक नावाला आणली, गोकुळ दूध संघ चांगल्या पद्धतीने चालवला आहे. यानंतर आता नवीन मोहीम हाती घेणार आहे. मतदार संघासह जिल्ह्यात पित्ताशयातील खडे मुतखडे अशा वेगवेगळ्या आजारापासून नागरिकांना मुक्ती देण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून शिबिर चालू करण्याचा मानस आहे. तर महिलांसाठी पिशवी व स्तनांचा रोग होऊ नये एक ही महिला कॅन्सर पासून मृत्यू होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल यासाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. असे बोलताना नाम. हसन मुश्रीफ म्हणाले.

चौकट.
नाम. हसन मुश्रीफ.
पुढील विधानसभा निवडणुकीचे आरक्षण कसे होईल काही सांगता येत नाही. माझी अजून एक वेळ विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. महिला आरक्षण झाल्यास. लोकसभा निवडणूक लढवून केंद्रातील मंत्रिपदावर काम करत जिल्ह्याचा विकास करण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री यांनी २६ जानेवारी रोजी सादर केलेली…. कविता… महाराष्ट्र आता थांबणार नाही. या कवितेचे ना. मुश्रीफ यांचेकडून वाचन….
यावेळी आजरा कारखाना संचालक दिपक देसाई यांनी गावातील विकास कामाचा आढावा घेतला. यापेक्षाही अधिक व सुंदर काम करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडलेले असे पुन्हा घडू नये. सोबत राहायचं असेल तर एकनिष्ठपणे काम करावे असे सुचित केले.
सरपंच बापू निऊगरे म्हणाले नाम. मुश्रीफ साहेबांनी गावच दत्तक असल्यामुळे भरभरून दिले आहे. गावचा विकास केला आहे. अजूनही पानंद रस्ते काही वाईट आहेत व झालेले रस्ते डांबरीकरण व्हावे. तसेच प्राथमिक शाळा फार वर्षांपूर्वी झालेली आहे. ती नव्याने शाळा व्हावी. विविध कामाच्या मागण्या या नागरी सत्कार प्रसंगी सरपंच श्री निऊगरे यांनी केली.
यावेळी युवराज येसणे, शेतकरी संघाचे नूतन चेअरमन महादेव पाटील यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
विविध संस्था, ग्रामपंचायत, आजी-माजी सैनिक संघटना, ग्रामस्थ, यांच्यावतीने ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आजरा साखर चेअरमन वसंतराव धुरे, माजी सभापती भिकाजी गुरव, विष्णुपंत केसरकर, माजी जि प उपाध्यक्ष सतीश पाटील, गणपतराव सांगले, हनुमान समुहाचे अध्यक्ष के. व्ही. येसणे, शिरीष देसाई, विजय वांगणेकर ,सुनील देसाईंनी संभाजी तांबेकर मारुती घोरपडे , जे. एल पोवार, अनिकेत कवळेकर, उपसरपंच पांडुरंग जाधव, उपस्थित मडिलगे ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्या मनीषा काणेकर यांनी मांनले.
