HomeUncategorizedअयोध्येतील भव्य राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान.- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामांच्या मूर्तीची...

अयोध्येतील भव्य राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान.- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.🟥मुंबई पोलिसांची तब्‍बल 12,899 पदे रिक्त.- धक्कादायक बाब उघड.- वाचा सविस्तर🛑आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर.- समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा.👇👇

अयोध्येतील भव्य राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान.- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
🟥मुंबई पोलिसांची तब्‍बल 12,899 पदे रिक्त.- धक्कादायक बाब उघड.- वाचा सविस्तर
🛑आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर.- समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा.👇👇

अयोध्या :- वृत्तसंस्था.

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्यानगरी दुमदुमून गेली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामाची विधीवत पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली.
🟥आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना कोट्यावधी रामभक्तांचा ऊर अभिमानने भरून आला होता. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते. मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक झाले होते. दरम्यान, भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांना भावना अनावर झाल्या होत्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या.
अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. दरम्यान, आज दिवसभर हा सोहळा सुरू असणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुलं होणार आहे.

🟥मुंबई पोलिसांची तब्‍बल 12,899 पदे रिक्त.- धक्कादायक बाब उघड.- वाचा सविस्तर तपशील.

मुंबई – प्रतिनिधी.

मुंबई पोलिसांची 12,899 पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजमितीस अप्पर पोलीस आयुक्तपदापासून शिपाईपदापर्यंत 12 हजार 899 पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. तर शिपाई पदांची सर्वाधिक संख्या आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याचे समोर येत आहे.
🔴गलगली यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची माहिती दिली.यात एकूण मंजूर पदांची संख्या 51,308 आहे. यात 38,409 कार्यरत पदे असून 12,899 पदे रिक्त असल्याची आकडेवारी आहे.
🔺यात पोलीस शिपायाची 28,938 पदे मंजूर आहेत. यापैकी 17,823 कार्यरत पदे असून 11,115 पदे रिक्त आहेत.
🔺यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची 3543 पदे मंजूर असताना फक्त 2318 कार्यरत पदे असून 1225 पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक ही 1090 मंजूर पदे असून यापैकी 313 पदे रिक्त असून सध्या 977 कार्यरत पदे आहेत.
🔺सहाय्यक पोलीस आयुक्तांची 141 पैकी 29 पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची 43 पदे मंजूर असून 39 पदे कार्यरत आहेत. यात 4 पदे रिक्त आहेत, तर अप्पर पोलीस आयुक्तांचे 12 पैकी फक्त 1 पद रिक्त आहे.

सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ

अनिल गलगली यांनी माहिती दिली की, मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही, पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली, तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण नक्कीच कमी होईल.

🔴 आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर.- 🅾️समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा.- कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांना भावासह साेमवारी रत्नागिरीतील कार्यालयात चाैकशीसाठी हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती. साेमवारी ते कार्यालयात हजर हाेण्यासाठी निघताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली हाेती. यावेळी या कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता.
रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर हाेण्यापूर्वी आमदार साळवी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले हाेते. आमदार साळवी चाैकशीसाठी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व पदाधिकारीही खासदार राऊत यांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांसमवेतच आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक प्रभाकर साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.
कार्यकर्त्यांनी आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राऊत यांचे संपर्क कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय असा कार्यकर्त्यांनी जणू माेर्चाच काढला हाेता. कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करून या कारवाईचा निषेध केला. घोषणाबाजी होत असतानाच आमदार साळवी दाेन्ही भाऊ दीपक साळवी आणि संजय साळवी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.