Home Uncategorized केंद्र सरकारचे २ महत्त्वाचे निर्णय.- साखरेच्या दरात मोठी घट सर्वसामान्य ग्राहकांना मोठा...

केंद्र सरकारचे २ महत्त्वाचे निर्णय.- साखरेच्या दरात मोठी घट सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा – या दराने साखर खरेदी करा.👇

🟣केंद्र सरकारचे २ महत्त्वाचे निर्णय.- साखरेच्या दरात मोठी घट सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा – या दराने साखर खरेदी करा.👇

नवीदिल्ली – वृत्तसंस्था

साखरेच्या वाढत्या दरांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर गगनाला भिडले होते. केंद्र सरकारनं घेतलेल्या २ निर्णयांमुळे साखरेच्या दरात १८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. यानंतर साखरेच्या दरात घट झाली आहे. साखरेचे दर ५५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.

खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत साखरेच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळेल. गेल्या १५ दिवसांत देशभरात साखरेचे दर वाढलेले पाहायला मिळाले. साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले. ते ६७ रुपये प्रतिकिलोवर गेले. साखर कारखान्यांनी मनमानी पद्धतीनं दरवाढ केल्यानं साखरेच्या किमती वाढल्याचं खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी सांगितलं. साखर कारखान्यांकडून दरवाढ करण्यात आल्यानं बाजारात साखरेच्या दरात उसळी घेतली. याचा थेट परिणाम घाऊक आणि किरकोळ किमतींवर झाला. साखरेचे दर ६७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्यावर केंद्र सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बाजारातील साखर उपलब्धता कायम ठेवण्यासाठी साखरेच्या आयातीला मंजुरी देण्यात आली. परदेशी बाजारातून साखर येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे देशातील बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती कमी झाली आहे. साखरेची साठवणूक करणाऱ्या, अवैधपणे साखरेचा साठा करणाऱ्या लोकांना सोडणार नाही, असा पवित्रा सरकारनं घेतला. साठेमारी रोखण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात आले. त्यामुळे साठवणूक करणारे रडारवर आले. या २ निर्णयांचे परिणाम तातडीनं दिसले. साखर कारखान्यांना दर कमी करावे लागले. ६७ रुपयांवर पोहोचलेली साखर ५५ रुपये प्रतिकिलोवर आली. येत्या काही दिवसांत साखरेचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात होत असलेली घट यापुढेही सुरूच राहील, असा विश्वास खाद्य सचिवांनी बोलून दाखवला. पुरवठा साखळी सामान्य झाल्यावर आणि आयात करण्यात आलेली साखर बाजारात पोहोचल्यावर दरात आणखी घट होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.