आजरा पोलिसांची नशेत दुचाकी, चालवण्याच्या वर केली धडक कारवाई.
🟣दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्यावर गुन्हा
आजरा येथे दारूच्या नशेत दुचाकी चालविल्याप्रकरणी गुन्हा.
आजरा | प्रतिनिधी.
दारू पिऊन दुचाकी चालवित असताना आढळून आल्याप्रकरणी विष्णू पुंडलिक पन्हाळकर (वय ५२, रा. करंजवळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०५ वाजता आजरा ते उत्तूर रोडवर उत्तूर पोलीस दूरक्षेत्रासमोर उत्तूर, ता. आजरा गावाजवळ संबंधित व्यक्ती हिरो होंडा पॅशन प्लस (एमएच ०९ एव्ही ०७१०) ही दुचाकी चालविताना आढळून आली. त्याने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🟣 बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या दोघांवर गुन्हा
आजरा परिसरात बेदरकार वाहन चालविणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई.
आजरा | प्रतिनिधी.
आजरा परिसरात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या दोन तरुणांवर आजरा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणात प्रदीप अशोक पवार (वय ३६, रा. मुळचे? पेठे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता आजरा ते गडहिंग्लज जाणाऱ्या रोडवर रामतीर्थ येथे तो बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (एमएच ५१ जे ०७४५) बेदरकारपणे चालविताना आढळून आला.
दुसऱ्या प्रकरणात अर्जुन मनोहर बोलके (वय २०, रा. माळवाड, ता. आजरा) याच्यावर कारवाई करण्यात आली. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता आजरा ते आंबोली जाणाऱ्या रोडवर तो पॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल (एमएच ०९ सीआर २१०७) बेदरकारपणे चालविताना आढळून आला.
दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
🟣दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यावर कारवाई
आजरा येथे मद्यप्राशन करून दुचाकी चालविल्याने गुन्हा दाखल.
आजरा | प्रतिनिधी.
मद्यप्राशन करून दुचाकी चालविणाऱ्या बाबुराव लक्ष्मण नाईक (वय ५५, रा. आर्डाळ, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याच्यावर आजरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आजरा ते उत्तूर रोडवर उत्तूर पोलीस दूरक्षेत्रासमोर संबंधित व्यक्ती हिरो होंडा सी.डी. डिलक्स (एमएच ०९ सीसी २९८८) ही दुचाकी चालविताना आढळून आली. त्याने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



