HomeUncategorizedमडिलगे श्रीराम दूध संस्थेच्या चेअरमन पदी दीपक देसाई तर व्हा. चेअरमन पदी....

मडिलगे श्रीराम दूध संस्थेच्या चेअरमन पदी दीपक देसाई तर व्हा. चेअरमन पदी. सदाशिव येसने यांची बिनविरोध निवड.

मडिलगे श्रीराम दूध संस्थेच्या चेअरमन पदी दीपक देसाई तर व्हा. चेअरमन पदी सदाशिव येसने यांची बिनविरोध निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथील भावेश्र्री संस्था समूहाची श्रीराम दूध सहकारी संस्था मर्यादित मडिलगे या संस्थेच्या दहा वर्षानंतर नव्याने चेअरमन नियुक्ती करण्यात आली यामध्ये केवळ एकच अर्ज आल्याने बिनविरोध म्हणून कारखान्याचे संचालक व माजी उपसभापती दीपक देसाई यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी भावेश्वरी संस्था समूहाचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष माजी सभापती भिकाजी गुरव होते.
यावेळी सूचक राजाराम येणे व अनुमोदक संजय घंटे यांनी केले.

तसेच व्हा. चेअरमन पदी सदाशिव धोंडिबा येसने यांची निवड करण्यात आली सुचक शिवाजी गुरव तर अनुमोदक देवानंद पाटील यांनी केले. निवडीनंतर सभासद व संचालक मंडळ यांनी नूतन निवडीच्या श्री देसाई व येसने यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती भिकाजी गुरव त्या मागील संचालक मंडळ यांच्या माध्यमातून ३०/१०/१९९२ रोजी संस्थेची स्थापना झाली आज अखेर निपक्षपाती व सभासदांच्या हिताचे ही संस्था काम करत आहे. संचालक शिवाजी गुरव यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.