Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

आजरा : – प्रतिनिधी.

मृत्युंजयकार ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जनता शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, श्री आप्पासो पावले, चंद्रशेखर भटकडळी, इंजि. जितेंद्र शेलार, प्रा. मनोज पाटील, हेमंत गिलबिले, बी. एम. कामत, वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्ष विद्या हरेर, सहकार्यवाह रवींद्र ज्येष्ठ, संचालक संभाजीराव इंजल, अंजली बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, महम्मद अली मुजावर, संचालिका सुचिता गड्डी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुस्कर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पवार यांच्यासह वाचनालयाचे वाचक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे स्वागत वाचनालयाचे संचालक संभाजी इंजल यांनी केले. अध्यक्ष वामन सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मृत्युंजय, छावा यांसारख्या साहित्यकृतींतून मराठी साहित्यविश्वात अजरामर ठसा उमटविणाऱ्या शिवाजी सावंत यांच्या स्मृतींना यावेळी उपस्थितांनी अभिवादन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.