HomeUncategorizedमराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा.

कोल्हापूर : प्रतिनिधी.

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.
शासनाच्या न्याय. शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदणीधारकांना तातडीने कुणबी दाखले द्यावेत, जात पडताळणी विभागाने विनाकारण त्रुटी काढून दाखले देण्यास विलंब करू नये, तसेच सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर व सातारा गॅझेट लागू करावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून उपोषणाचा सातवा दिवस उलटूनही शासनाने अद्याप या मागण्यांबाबत दखल घेतलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने या सर्व प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होऊन १२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाआंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मारुती मोरे सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.