🟣आझाद मैदानावरील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार.
( आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते पालकांच्या बैठकीत निर्धार.)
🟣 गवसे-दाभिल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात!.
🛑आझाद मैदानावरील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार.
( आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते पालकांच्या बैठकीत निर्धार.)
आजरा – प्रतिनिधी.

आझाद मैदान मुंबई येथे होणारे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार आज आजरा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षांनी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पवार होते.
शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी आज आजरा येथे बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा मंचचे राज्य निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी या आंदोलनामागील भूमिका मांडली. ते म्हणाले राज्य आणि केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरणाच्या आडून राज्यातील वाडीवस्तीवरील शाळा बंद करू पाहत आहे. १५ मार्च २०२४ ला शासन निर्णय करून माध्यमिक शाळांची मधील शिक्षक पटसंख्येचे कारण सांगून कमी केले जात आहेत. तालुका निमशहरी भागातील महाविद्यालय पटसंख्येची अट घालून कमी करण्याचा डाव चालू आहे. या विरोधात काही महत्त्वाच्या आणि मूलभूत मागणी घेऊन आझाद मैदान मुंबई येथे हे आंदोलन बेमुदत पद्धतीने सुरू होत आहे. या आंदोलनाच्या मुख्य पाच मागणी आहेत. पहिली मागणी गाव वाडी वस्ती तांडा तिथे शाळा असली पाहिजे. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक व माध्यमिक शाळांना स्वतंत्र विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळाला पाहिजे. याबरोबरच ज्या महाविद्यालयांना मान्यता आहे ती महाविद्यालये बंद होता कामा नयेत. केजी टू पीजी शिक्षण सर्वांना गुणवत्तापूर्ण मोफत आणि समान मिळाले पाहिजे. शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पनाच्या किमान दहा टक्के केला पाहिजे. अशा मूलभूत मागण्या घेऊन हे आंदोलन उभा राहत आहे. या आंदोलनात राज्यातील वीसहून अधिक विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आजरा येथेही बैठक आयोजित केली आहे.
कॉम्रेड संजय तरडेकर म्हणाले आपण गावोगावी बैठका घेऊन आंदोलन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. मुंबईला आंदोलन सुरू झाले की इकडेही मोर्चे सभा निदर्शने सुरू करूया. एकाच वेळी मुंबई आणि राज्यभर हे आंदोलन सुरू राहील
समारोप करताना युवराज पवार यांनी या आंदोलनात राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत आजरा तालुका सर्वाधिक भागीदारी करेल. असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रवींद्र भाटले, संजय घाटगे, प्रकाश मोरस्कर, नामदेव फगरे, काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, युवराज जाधव, प्रकाश पाटील, रंगा माडभगत, आंतोन बारदेसकर, हिंदुराव कांबळे, निवृत्ती राणे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟣 गवसे-दाभिल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात!
आजरा : प्रतिनिधी.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गवसे ते दाभिल मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक व गणेशभक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आजरा पंचायत समिती सभापती सौ. यशोदा पोवार यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सांगावकर यांची मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) भेट घेऊन खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली.
सभापतींच्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाने गवसे-दाभिल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच दि. २० सप्टेंबरनंतर रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन विभागाकडून देण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात नागरिक व गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित व सुलभ व्हावा, यासाठी सभापती पोवार यांचा पाठपुरावा सुरू आहे.




