HomeUncategorizedमराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीचे दाखले.- ग्रामपंचायत/तलाठी सज्जाच्या नोटीस बोर्डावर प्रसारित केलेल्या यादी तसेच वरील...

मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीचे दाखले.- ग्रामपंचायत/तलाठी सज्जाच्या नोटीस बोर्डावर प्रसारित केलेल्या यादी तसेच वरील संकेतस्थळास भेट देवून यादया तपासून त्याची माहीती घ्यावी. – तहसीलदार समीर माने.

मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीचे दाखले.- ग्रामपंचायत/तलाठी सज्जाच्या नोटीस बोर्डावर प्रसारित केलेल्या यादी तसेच वरील संकेतस्थळास भेट देवून यादया तपासून त्याची माहीती घ्यावी. – तहसीलदार समीर माने.

आजरा‌.- प्रतिनिधी.

माहे डिसेंबर २०२३ पासून ते माहे जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये आजरा तालूक्यामध्ये संबधित तलाठी प्रशासनाकडून मराठा-कुणबी, कुणबी- मराठी च्या नोंदीची गावनिहाय शोध मोहिम घेतली. अभिलेख तपासणी करतांना मराठा-कुणबी, कुणबी- मराठी च्या एकूण ११६८० नोंदी आढळून आल्या आहेत, तसेच सदर सापडलेल्या नोंदींची यादी ग्रामस्तरावर ग्रामपंचायत/तलाठी सज्जा येथे प्रदर्शित करणेची कार्यवाही केली आहे. सदर नोंदीची EXCEL FILE करुन व सापडलेल्या नोंदी अभिलेखाची स्कॅनिंग करुन त्याची PDF स्वरुपात FILE तयार करणेत आली असून सदरची PDF FILES या गावनिहाय जिल्हयाच्या संकेतस्थळावर अपलोड करणेत आली असून ती नागरीकांना https://kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, तसेच सदरची स्वाक्षांकीत नक्कल PDF स्वरुपात डाऊनलोड देखील करता येणार आहे. यापुर्वी मागील दोन महिन्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुदरगड-आजरा या कार्यालयाकडून आजरा तालूक्यातील एकूण ५५ एवढे मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीचे दाखले वितरीत करणेत आलेले आहेत. तरी तालूक्यातील सर्व पात्र असलेल्या नागरीकांनी ग्रामपंचायत/तलाठी सज्जाच्या नोटीस बोर्डावर प्रसारित केलेल्या यादी तसेच वरील संकेतस्थळास भेट देवून यादया तपासून त्याची माहीती घ्यावी. असे अवाहन श्री समिर माने, तहसिलदार आजरा यांनी केले आहे.

Previous article
पहा देशातील राज्यातील दिवसभराच्या घडामोडी आज उद्या व परवा काय होणार देशात राज्यात मराठा आरक्षण व राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा…🚩👇 🔴मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीसांच्या सुट्ट्या रद्द.🟥आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार.- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय.🛑मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त.- १ हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात🟥मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत. तर उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण.🟥 अयोध्या नगरी सजली.-उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.