श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा उत्तुर – मडिलगे गटात प्रचार दौरा.
आजरा.-प्रतिनिधी.

आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीचा जस – जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तसा उमेदवार प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. उत्तुर मडिलगे विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, दीपक देसाई यांनी दि ११ रोजी. मतदारांच्या घरोघरी जाऊन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ मडिलगे, वडकशिवाले महागोंड, माहागोंडवाडी,आर्दाळ, होन्याळी, कर्पेवाडी सह भागातील सर्व गावांमध्ये पदयात्रा प्रसंगी शेतकरी सभासद व कार्यकर्ते व सर्व उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेला भागातून चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी उत्तुर जिल्हा परिषद विभागातील तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीचे व श्री रवळनाथ शेतकरी आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

