HomeUncategorizedश्री चाळोबादेव शेतकरी आघाडी प्रमुखांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्यावर केला हल्लाबोल.- ( पालकमंत्री...

श्री चाळोबादेव शेतकरी आघाडी प्रमुखांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्यावर केला हल्लाबोल.- ( पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान झालेल्या आरोपांचे उत्तर )

श्री चाळोबादेव शेतकरी आघाडी प्रमुखांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्यावर केला हल्लाबोल.- ( पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान झालेल्या आरोपांचे उत्तर )

आजरा.- प्रतिनिधी.

श्री चाळोबादेव शेतकरी आघाडी प्रमुखांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या वर हल्लाबोल केला.- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान झालेल्या आरोपांचे उत्तर देण्यात आले.
( कार्यकर्त्यांचा दबाव हा त्यांचा बनाव ) उमेदवार
अभिषेक शिंपी म्हणाले : - साखर कारखाना निवडणूक होवू नये यासाठी आमचे पहिल्या पासूनच प्रयत्न होते मात्र राष्ट्रवादीनेच विश्वासघात केला. आणि निवडणूक लावली. जागा वाढवून देण्याची तयारी दाखवली मात्र आम्ही निवडणूकतच राहणार नाही असे सांगितले होते.त्यांनी नेते हसन मुश्रीफ यांचा अपमान केला आहे. कार्यकर्त्यांचा दबाव हा त्यांचा बनाव आहे.
त्यांना निवडणूक लावायचीच होती.
कारखान्याला केंद्राची मदत मिळावी यासाठी नेते अशोक चराटी यांना सुरुवातीला प्राधान्य देण्याचे ठरले होते. जिल्हा बॅंक आता कर्ज देवू शकत नाही. केंद्रीय पॅकेज मिळाले तर व्याज व हप्ता कमी बसेल यासाठी प्रयत्न सुरु होते मात्र राष्ट्रवादीने त्यात खो घातला. राष्ट्रवादीचे मुकूंद देसाई यांच्यावर कुरघोडी करण्यासाठीच सुधीर देसाई यांनी निवडणूकीचे षडयंत्र रचले असा आरोप ही त्यांनी केला
.

उमेदवार – अशोक चराटी:- भागातील ऊस दुसऱ्या कारखान्याला आणि संचालक आजरा कारखाण्याला ….

विष्णू केसरकर म्हणजे विषाणू’
कोलांट्या उड्या मारणारे म्हणून विष्णू केसरकर यांची जिल्ह्याभर नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहेत. साड्या वाटप कार्यक्रम हा वैयक्तिक स्वतःच्या पैशाने घेतला होता. मात्र त्याचे विनाकारण ते बाऊ करत आहेत. कारखान्याचे बेरींग चोरी प्रकरण का थांबले हे तालुक्याला माहीत आहे.
पाच वर्षांत चेअरमन न मिळाल्याने तो राग मनात धरून वसंतराव धुरे यांनी माझ्यावर टीका करत आहेत.मी पनवती नाही उलट कारखान्यात माझे जे योगदान आहे ते धुरेंचे नाही.३५ हजार टन उत्तूर भागात ऊस आहे.
🛑आजरा कारखान्याला केवळ पाच हजार टन येतो. नाम.मुश्रीफ यांची मर्जी सांभाळण्यासाठी ते संताजीला ऊस पाठवतात.ऊस तिकडे आणि संचालक मात्र इकडे.
मलिककुमार बुरुड: चुलबुलानेच निवडणूक लावली.
आम्ही प्रामाणिक हाक मुश्रीफांना दिली त्यांनीही प्रयत्न केले मात्र चुलबूलाने निवडणूक लावली. कारखान्याचे दायित्व स्विकारण्याची सतेज पाटील व विनय कोरे यांनी आघाडी करण्याची परवानगी दिली. कारखाना बंद होता त्यावेळी आम्हीच आर्थिक सहकार्य केले.त्यावेळी रक्कम मिळू नये म्हणून या मंडळींनीच खो घातला.

बशीर खेडेकर.- राष्ट्रवादीला मुस्लिमांची मते मागण्याचा अधिकार नाही.
मला पंचायत समिती सभापती करण्यासाठी माजी आमदार के.पी.पाटील यांनी विरोध केला. त्यांच्या मनात जातीयवाद आहे. मुस्लिम समाजाची मते मागण्याचा अधिकार त्यांना नाही.

माजी. चेअरमन चेअरमन सुनील शिंत्रे यांनी झालेल्या आरोपाच्या प्रतिक्रिया व्यासपीठावरून झालेत त्याचे उत्तर व्यासपीठावरून दिले जाईल असे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला चेअरमन मलिककुमार बुरुड, दशरथ अमृते, प्रकाश चव्हान, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.