माजी पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर यांचे दुःखद निधन.
आजरा.-प्रतिनिधी.
आजरा येथील मुस्लिम समाजाचे नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य बशीरभाई खेडेकर यांचे दि.१२ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने आजरा शहरात व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मागील महिन्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते नुकतेच चार दिवसांपूर्वी रुग्णालयातून बरे होऊन घरी आले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आहे.
