Home Uncategorized परिवहन महामंडळाच्या वाढत्या खर्चामुळे एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ, 17 जुलैपासून नवीन दर...

परिवहन महामंडळाच्या वाढत्या खर्चामुळे एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ, 17 जुलैपासून नवीन दर लागू.पहा..

परिवहन महामंडळाच्या वाढत्या खर्चामुळे एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ, 17 जुलैपासून नवीन दर लागू.पहा..

मुंबई – प्रतिनिधी.

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये केलेली वाढ, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होणार आहे. एसटीची ही दरवाढ शुक्रवार दि. 17 जुलै 2026 च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू झाली आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरला आहे.
ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि इतर खर्चांमुळे ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेण्यात आली आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाकडून गर्दीच्या हंगामात 10 टक्के प्रवास भाडे वाढ करण्यात आली होती. ती प्रवासी भाडेवाढ 15 जुलैपर्यंत होती. मात्र, ती मुदत संपताच साध्या बसेसवरील 10 टक्के भाडेवाढ 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय नव्याने भाडेवाढ करण्यात आल्याने रद्द करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, ही अपेक्षा आहे.”
महागाईचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दरवाढीची झळ पोहोचणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.