आजरा नगरपंचायतीच्या कारभारावर सत्ताधारी व विरोधक नाराज
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतीची दि २७ रोजी मासिक सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक चराटी होते. अधिकारी निहाल नाईकवाडे यांनी सभेचे इतिवृत्त वाचन करित होते.
मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सुरुवातीलाच अनेक प्रश्नाचा भडीमार झाला. नगरसेवक अनिकेत चराटी यांनी ठेकेदारांच्याकडून कामाला उशीर लागत असल्याने या विषयाबाबत विचारणा करत असताना विरोधी व सत्ताधारी नगरसेवक यांनी प्रशासनाला घनकचरा, कचरा वर्गीकरण, आरोग्य, पाणी, अशा वेगवेगळ्या विषयावर वादळी चर्चा झाली.
अनेक महिन्यापासून, वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन तोंडी चर्चा करून देखील दुर्लक्ष करत असल्याने आजच्या सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. अनेक महत्त्वाच्या विषयात सोबत ग्रामीण रुग्णालयासमोर उभारलेला सोलर प्रोजेक्ट हा राज्यातील पहिलाच प्रोजेक्ट.कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या या प्रकल्पाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रोजेक्टची दैनिय अवस्था झाली आहे .त्यावर पडलेला कचरा, तुटलेल्या केबल कनेक्शन्स होत असलेली नादुरुस्ती याकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. लाखो रुपयांचे लाईट बील खर्च वाचवणारा हा प्रकल्प धुळ खात पडला आहे. या विषयाबाबत नगरसेवक परेश पोतदार यांनी व सभागृह मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता मानसी कदम यांना धारेवर धरत नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी नगरपंचायत कारभाराचा पोलखोल करत संबंधित वेगवेगळ्या विषयाबाबत कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली.या विषयाबाबत नगराध्यक्ष अशोक चराटी यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरत जबाबदारीने काम करत नसाल तर होणाऱ्या परिणामाला आपण स्वतः जबाबदार असाल. मुख्याधिकारी सह वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर विचारणा झाली. यामध्ये अनिकेत चराटी, परशुराम बामणे, असिफ पटेल, विक्रम पटेकर, सौ. पुनम लिचम, यांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभागी होत अधिकारी व कर्मचारी कोणत्या पद्धतीने काम करतात नगरसेवक यांच्या प्रभागातील घराशेजारी कचरा उचलत नाहीत ते आजरा शहरातील कचऱ्याची समस्या कसे मार्गी लावतील याबाबत नगरसेवक निसार लाडजी यांनी सभागृहात आवाज उठवला नगरपंचायत कार्यालयातून खऱ्या नखला कागदपत्रे गायब होत आहेत. याची कल्पना अधिकाऱ्यांना नाही.काय चाललंय तरी काय? झक मारलो व नगरसेवक झालो अशी अवस्था आमची झाली आहे.
स्ट्रीट लाईट सकाळी लवकर बंद होत नाही, कचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, रस्त्यावर मुरुम टाकावा अशी सूचना असताना कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, नगरपंचायत वेळेत बीले अदा करत नाही. अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश झोत टाकण्यात आला.
नगरपंचायतीचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय हे आजच्या चर्चेतून मात्र उघड झाले. मात्र आजच्या सभेतील विषय बाजूलाच राहून मागील सभेचे इतिवृत्त देखील वाचण्यापूर्वी सभेमध्ये प्रश्नाचा भडिमार झाला. यामुळे आजची सभा म्हणजे अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्नाचा जाब विचारणाचा तास होता की मासिक सभा होती. असा प्रश्न उपस्थित झाला.
या वादळी मासिक सभेला उपनगराध्यक्षा पुजा डोंगरे , मुख्याधिकारी सुरज सुर्वे, रहिमतबी खेडेकर, निशात चाॅद, कलावती कांबळे, आसिफ सोनेखान, सौ. अश्विनी चव्हाण, रेश्मा बुड्ढेखान, स्मिता परळकर, तसेच इंद्रजीत देसाई, विक्रम पट्टेकर सह नगरसेवक उपस्थित होते.
