HomeUncategorizedसंकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी नागपूर अधिवेशनाला आंदोलनासाठी रवाना.

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी नागपूर अधिवेशनाला आंदोलनासाठी रवाना.

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी नागपूर अधिवेशनाला आंदोलनासाठी रवाना.
आजरा. प्रतिनिधी.

  नागपूर येथे दिनांक 13-12- 2023 रोजी *महाराष्ट्र राज्य महामार्ग बाधित महासमिती* मार्फत आंदोलन केले जाणार आहे. राज्यस्तरावरील महा समितीमध्ये संकेश्वर - बांधा शेतकरी संघटना एकत्रित काम करत असून या राज्यव्यापी लढ्यामध्ये सामील होण्यासाठी शेतकरी व कार्यकर्ते रेल्वेने नागपूरला रवाना झाले आहेत.     नागपूरला या आंदोलनाला रवाना होण्यापूर्वी संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची  शिष्टमंडळाने मडिलगे येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आहे.  त्याच पद्धतीचे निवेदन मुख्यमंत्री यांना नागपूरच्या अधिवेशन काळात देण्यात येणार आहे.
      पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान मा. मुश्रीफ यांनी संघटना प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना अधिवेशन झाल्यानंतर प्रांताधिकारी व महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे निमंत्रक काँम्रेड. शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे गणपतराव येसने, दिगंबर होरंबळे, अण्णासो पाटील, अनिल शिंदे, सागर भाटले, शिवाजी डोंगरे, हरिराम चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.