Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशेतकर्याना मागणी प्रमाणे विनाअट खते शासनाने द्यावी.आजरा येथे माकपची मागणी

शेतकर्याना मागणी प्रमाणे विनाअट खते शासनाने द्यावी.आजरा येथे माकपची मागणी

शेतकर्याना मागणी प्रमाणे विनाअट खते शासनाने द्यावी.
आजरा येथे माकपची मागणी

आजरा.-प्रतिनिधी.

ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर राहणारे शेतकरी यांच्या कडे फोनची रेंज वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शासनाने खते देण्यासाठी घातलेली आँनलाईन नोंद रद्द करून , शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावी. यासाठी आजरा नायब तहसिलदार विकास कोलते यांना सर्वश्रमीक संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

खतांचे वाचलेले दराने शेतकरी अडचणीत असताना आँनलाईन खतांची नोंद करुन केवळ जुजबी खते देऊन शेतकऱ्यांची फसवणूक व अडचण केली जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून रासायनीक खता शिवाय शेती पिकत नाही. शेतकरी खतांचा योग्य वापर करत असताना, गैर वापर करण्यार्याना मोकाट सोडून शासन शेतकऱ्यांच्या आड येत शेती व शेतकरी यांना अडचणीत ठेवत आहे. पेट्रोल डिझेल चे दर वाढल्याने मशागतीचे व मजूरांचे दर वाढले ,तर जंगली जनावरे शेतीचे नुकसान करीत आहेत. याचा परिणाम शेती उत्पादनांवर होत असल्याने शासनाने विनाअट खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काँ.शांताराम पाटील यांनी केली आहे.
यावेळी नारायण भडांगे, महादेव होडगे ,हिंदूराव कांबळे, काका देसाई, निवृत्ती मिसाळे, दौलती राणे, सदाशिव नार्वेकर, काशिनाथ मोरे , संजय घाटगे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.