त्रिपुराचे माजी राज्यपाल.- पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन.
कोल्हापूर : प्रतिनिधी.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे वयाच्या ९०व्या वर्षी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यांसह विविध क्षेत्रांत त्यांनी शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभारले. शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
