श्री चाळोबा देवानेच वेगवेगळ्या पक्षांची व एका विचारांची लोक एकत्र आणली.- कारखाना सक्षमपणे चालवुन दाखवणार – कारखाना कर्जमुक्ती साठी प्रयत्न करणार – माजी. जि.प. अध्यक्ष उमेश आफटे.
( वडकशिवालेत श्री. चाळोबा देव विकास आघाडीचा. सभासदांची संवाद.)
आजरा.- प्रतिनिधी.
श्री चाळोबा देवानेच वेगवेगळ्या पक्षांची व एका विचारांची लोक एकत्र आणली आहेत. आघाडीच्या विजयासाठी सभासदांचे मतदान महत्त्वाचे असते. व आपले अनमोल पवित्र मत श्री चाळोबा देव विकास आघाडीच्या उमेदवारांना देऊन विजय करावे आमची आघाडी कारखाना सक्षमपणे चालवुन दाखवून केंद्राच्या व राज्याच्या माध्यमातून कर्जमुक्ती साठी प्रयत्न करणार असल्याचे वडकशिवालेत झालेल्या सभासदांची संवाद व सभासदांच्या संचालकाकडून अपेक्षा या बैठकीला संबोधित करताना माजी. जि.प. अध्यक्ष उमेश आफटे बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच संजय शिंदे यांनी केले पुढे बोलताना श्री आपटे म्हणाले एका विचारानं एकत्र येऊन निवडणूक लढवत अहोत. कारखान्यावर कर्ज आचानक वाढले नाही.. पण हा कर्जाचा बोजा कसा कमी करता येईल यासाठी अन्य प्रोजेक्ट चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. ते कर्ज टप्याटप्याने वाढले आहे. कारखाण्याच्या उभारणीत सभासद म्हत्वाचा असतो. संचालक म्हणून जात असताना कारखाना वाचला पाहिजे, ऊस वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे, अन्य प्राजेक्ट उभारले पाहिजे यासाठी काम केले पाहिजे. म्हणून या विचाराने आम्ही या आघाडीच्या माध्यमातून आपल्यासमोर मते मागण्यासाठी आलो आहोत. पण फक्त संचालक होण्याची लालसा नाही. पण आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व मंडळी कारखाना पुन्हा कर्जातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु सर्वांनी मतदान करावं असे आवाहन केले.

यावेळी उमेदवार माजी सभापती भिकाजी गुरव म्हणाले कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा व कारखान्याचे पुढील जडणघडण व कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी श्री चाळोबा देव विकास आघाडीत एका विचाराचे लोक एकत्र आले आहेत. आम्हाला आपला आशीर्वाद व आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान आपण करावं व आम्हाला आपली कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक, कामगार कारखाना संबंधित येणाऱ्या लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी. आपण दिलेल्या संधीचे नक्कीच आम्ही सोनं करू व कारखान्याच्या हितासाठी काम करू असे बोलताना श्री गुरव म्हणाले

यावेळी बोलताना उमेदवार प्रकाश चव्हाण म्हणाले निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना आचानक निवडणूक लादली पण पण विरोधकांवर टीका करत बसण्यापेक्षा आम्ही आमच्या आघाडीच्या कर्तृत्वातून कारखाना पुन्हा चालवून दाखवतो आम्हाला राजकारण करता येत नाही किंवा समजत नाही फक्त डोळ्यासमोर दृष्टिकोन चांगला ठेवून चांगलं काम करता येतं या आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान करा व पुन्हा हा कारखाना कर्जमुक्त करूनच कारखाना चांगला चालू व पुढील निवडणुकीत मते मागण्यासाठी आपल्यासमोर येऊ पण कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका आपण जागृत मतदार आहात. कारखाना उभारणीत आपला मोलाचा वाटा आहे याची जाणीव आम्हा उमेदवारांना आहे. कप बशी या चिन्हासमोर शिक्का मारून सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले.

माजी लोकनियुक्त सरपंच संतोष बेलवाडे यांनी सभासदांना संचालकाकडून काय अपेक्षा आहेत व श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे सर्वच उमेदवार मतदान देण्यास पात्र आहेत. कारखाना वाचावा व चांगल्या पद्धतीने चालावा कर्जमुक्त व्हावा यासाठी चांगल्या विचाराचे व एक विचाराचे लोक एकत्र येऊन हा कारखाना वाचवतील असा विश्वास सभासदांना आहे. यामुळे निश्चितपणे आम्ही सर्व सभासद या आघाडीच्या पाठीशी असल्याचे बोलताना श्री बेलवाडे म्हणाले.

यावेळी वडकशिवालेतील बळवंत कदम, शंकर कदम, दिनकर कसलकर, मनोहर गोविलकर, बाबुराव कांबळे, भिकाजी कांबळे, दत्तात्रय खराडे, अमोल बांबरे, महेश करंबळी, सर्व सभासद, शेतकरी तसेच महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री कदम यांनी आभार मानले.
