गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनिल राणे व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच आम. प्रकाश आबिटकर यांचे उपस्थितीत. – कुर, ता. भुदरगड मेळावा. 🛑चंदगड ची माती दिल्लीला पोहचवण्यासाठी – सबनीस यांची निवड. – मेरी माठी, मेरा देश अभियान अंतर्गत 🛑
रोटरी क्लब गडहिंग्लज’चा स्तुत्य उपक्रम : २५ लाखांच्या अत्याधुनिक श्रवणयंत्रांचे वाटप.🛑
आजरा.- प्रतिनिधी.

गिरणी कामगार, त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळणेसाठी म्हाडाकडे प्राप्त अर्जाची पात्रता पुढील ३ महिन्यांमध्ये करण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने म्हाडाकडून १४ सप्टेंबर, २०२३ पासून वांद्रे पूर्व, मुंबई येथे कामकाज सुरू करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई येथे जाणे आर्थिकदृष्ट्या व बहुतांशी गिरणी कामगार वयोवृध्द असल्याने गैरसोईचे होत होते. याकरीता सदर कॅम्पचे आयोजन कोल्हापूर येथे करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार हून अधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बुधवार दि. ११ ऑक्टोंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कुर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आम. सुनिल राणे व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आम. प्रकाश आबिटकर यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कालबद्ध विशेष अभियानास आपण व आपल्या संबंधीत गिरणी कामगार यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सर्व श्रमिक गिरणी कामगार संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांनी आवाहन केले आहे.
चंदगड ची माती दिल्लीला पोहचवण्यासाठी – सबनीस यांची निवड. – मेरी माठी, मेरा देश अभियान अंतर्गत.
चंदगड.- प्रतिनिधी.

चंदगड तालुक्यातील माती आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माठी ,मेरा देश अभियान भारत भर राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून चंदगड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत , चंदगड नगरपंचायत तसेच इतर शासकिय कार्यालय यांच्या मार्फत विविध कार्यक्रम तालुक्यामध्ये राबविण्यात आले. हर घर तिरंगा अभियाना पासुन सुरू झालेल्या कार्यक्रमांची सांगता मेरी माठी, मेरा देश या कार्यक्रमाने झाली.तालुक्यातील सर्वच गावामधील माती कलशामधुन पंचायत समिती चंदगड येथे दि. ०९/१०/२०२३ रोजी आणण्यात आली. संपुर्ण माती एकत्र एका कलशामध्ये करण्यात आली.युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र कोल्हापुर चे प्रतिनिधी अमेय विलास सबनीस यांच्याकडे सदर कलश पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सुपूर्त केला. अमेय सबनीस यांनी मेरी माठी, मेरा देश अभियानाचा उद्देश सर्वांना सांगितला. तसेच सदर माती दिल्लीला घेऊन जाण्याचे भाग्य आपल्याला मिळाले त्याबद्दल भारत सरकारचे आभार देखिल मानले.
सदर माती दिल्ली येथे एका ठिकाणी करून अमृत वाटिका तयार करणार आहेत. माठी को नमन, विरोंको वंदन अंतर्गत अमृत वाटिकेत रोप लागवड करणार आहेत, आणि हिच आपल्या शहिद जवानांन साठी आदरांजली असेल.
चंदगड मधिल व्यक्ति त्या ठिकाणी दिल्ली ला गेल्यास त्याला अभिमान वाटेल कि आपल्या गावच्या मातीचा सुवास या अमृत वाटिकेत आहे. संपुर्ण देशातील विविध ठिकाणाहून माती येथे एकत्र होईल आणि विविधतेतुन एकता हा संदेश जगभर पोहचेल. हा या अभियानाचा उद्देश होता.
रोटरी क्लब गडहिंग्लज’चा स्तुत्य उपक्रम : २५ लाखांच्या अत्याधुनिक श्रवणयंत्रांचे वाटप.
गडहिंग्लज . प्रतिनिधी

‘रोटरी क्लब ऑफ गडहिंग्लज मिडटाऊन’चा पहिलाच सामाजिक उपक्रम ‘अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप’ उदंड प्रतिसादात पार पडला. माध्यमिक पतसंस्था सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक मांगले होते. तर महेश अनगोळकर (बेळगाव), प्रविण तारळे (निपाणी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना कान नाक घसा तज्ञ डॉ. किशोर जगदाळे म्हणाले, आवाजापासून दूर गेल्याचे दुःख ज्याला माहीत आहे त्यांना या श्रवणयंत्राची खरी किंमत कळते. किमती जास्त असल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी रोटरी क्लबमुळे पंचवीस हजारांची अत्याधुनिक डिजिटल मशीनमुळे ऐकण्याचा क्षण येताच गरीब आणि गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असतो. रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक मांगले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, रोटरी क्लब ही जगातील सर्वात जुनी म्हणजेच १२५ वर्षांची परंपरा असलेली एकमेव सामाजिक संस्था आहे. ग्रामीण भागात तळागाळातील गरीब गरजू लोकांना सेवा देण्याची संधी मिळते हेच आमचे भाग्य आहे. रोटरी गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी चळवळ फोफावत आहे. स्थानिक उद्योजकांनी यामध्ये सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रितम कापसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतिक क्षीरसागर, शिवराज विद्यासंकुलचे उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात जवळपास शंभर श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. ज्यांची अंदाजे किंमत २३ ते २५ लाख रुपये आहे. एकंदर रोटरीचा पहिलाच कार्यक्रम ओव्हरफुल्ल होता अशी कार्यक्रमस्थळी चर्चा होती. सरपंच संघटनेचे पदाधिकारी संजय कांबळे, रोटरी क्लबचे खजिनदार धनाजी कल्याणकर, मारुती कोलते, अर्जुन उद्योग समूहाच्या प्रिती मांडेकर, प्रतिक क्षिरसागर, मठपती सर, माजी उपसरपंच पिंटू मांगले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र रनणवरे, सचिन शेंडगे, प्रा. अमोल पाटील, परशुराम दुरूगडे, बाळकृष्ण रिंगणे, अनिल शिंदे, अश्वत्थामा रेडेकर, नितीन कोलते, अमर जांभळे, प्रा. सुमित देसाई, विजय फुटाणे, मुरारी चिकोडे, मिलिंद आपटे आणि सुधाकर गवळी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या डॉ. अनुपमा जाधव, विद्या गोसावी, अश्विनी शेंडगे, मंगल संकाजे, दीपिका सावगावकर, अर्चना देशपांडे, रंजना मगदूम आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळ पोटे पाटील यांनी स्वागत केले तर अतुल जाधव यांनी आभार मानले. मिलिंद आपटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब वेनुग्राम आणि रोटरी क्लब निपाणी यांचे सहकार्य लाभले.
चौकट :
रो. महेश अनगोळकर मनोगतात म्हणाले, गडहिंग्लज येथील क्लब सदस्य आणि जनतेचा उत्साह बघून आम्ही भारावून गेलो आहोत. खास गडहिंग्लज क्लबसाठी त्यांच्या मागणीनुसार दुसरा लॉटही आम्ही मंजूर करीत आहोत. लवकरच पुन्हा आपल्या सेवेत आम्ही हजर होऊ.

