HomeUncategorizedजिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी ११ ऑक्टोंबर रोजी...

जिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी ११ ऑक्टोंबर रोजी विशेष शिबीराचे.- आम. प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार🚩 🛑 निधन वार्ता.🛑मडिलगेतील शाहीर हनमंत भाईगडे यांचे दुःखद निधन. 🛑ग्रामदैवतेच्या पूजेचा मान कोणालाही दादागिरी करून घेता येणार नाही.- हरपवडे. ता.आजरा – उप समिती ग्रामस्थांना पदाचा गैरवापर करत – समिती पैशाची करते लूट.- तहसीलदारांना निवेदन दि १३/१०/२०२३ पासून आंदोलन. 🛑 👇👇

जिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी ११ ऑक्टोंबर रोजी विशेष शिबीराचे.- आम. प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार🚩 🛑 निधन वार्ता.🛑
मडिलगेतील शाहीर हनमंत भाईगडे यांचे दुःखद निधन. 🛑ग्रामदैवतेच्या पूजेचा मान कोणालाही दादागिरी करून घेता येणार नाही.- हरपवडे. ता.आजरा – उप समिती ग्रामस्थांना पदाचा गैरवापर करत – समिती पैशाची करते लूट.- तहसीलदारांना निवेदन दि १३/१०/२०२३ पासून आंदोलन. 🛑 👇👇

कोल्हापूर प्रतिनिधी,

🛑मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मुंबईतील ५८ बंद, आजारी गिरण्यांतील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार हून अधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कुर (ता.भुदरगड) येथे गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार श्री.सुनिल राणे व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत उद्या दि.११ ऑक्टोंबर, २०२३ रोजी सकाळी ११ वा. आयोजन कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे.
दि.२१ ऑगस्ट, २०२३ रोजी गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भातील बैठकीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देशित केले होते की, राज्याच्या एकंदरीत जडणघडणीत महत्त्वाचा भाग असलेल्या गिरणी कामगार, त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळवून देऊन जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाकडे प्राप्त अर्जांची पात्रता पुढील ३ महिन्यांमध्ये युध्द पातळीवर करण्याचे ठरले त्याअनुषंगाने म्हाडाकडून १४ सप्टेंबर, २०२३ पासून वांद्रे पुर्व येथे सुरू करण्यात आले आहे. परंतू कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई येथे जाणे आर्थिकदृष्टया व बहुतांशी गिरणी कामगार वयोवृध्द असल्याने गैरसोईचे होते. याकरीता सदर कॅम्प्चे आयोजन कोल्हापूर येथे करण्याची मागणी म्हाडाचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेकडे लेखीपत्राव्दारे केली होती. त्यानुसार कोल्हापूर येथे कॅम्प आयोजन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो गिरणी कामगारांना मुंबई येथे न जाता कूर (ता.भुदरगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पचा उपयोग होणार असून जिल्ह्यातील गिरणी कामगारांनी व त्यांच्या वारसांनी सदर कॅम्पला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

🛑निधन वार्ता.
शाहीर हनमंत भाईगडे यांचे दुःखद निधन
.

आजरा. – प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील हनमंत मर्याप्पा भाईगडे वय ७६ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
भाईगडे हे तालुक्यात शाहीर म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

🛑ग्रामदैवतेच्या पूजेचा मान कोणालाही दादागिरी करून घेता येणार नाही.- हरपवडे. ता.आजरा – उप समिती ग्रामस्थांना पदाचा गैरवापर करत – समिती पैशाची करते लूट.- तहसीलदारांना निवेदन दि १३/१०/२०२३ पासून आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

हरपवडे ता. आजरा येथील पारंपारिक ग्रामदैवत श्री रासूबाई देवीची पूजा करण्याचा मान मिळावा अन्यथा धरणे आंदोलन दि. १३/१०/२०२३ पासून करत असलेबाबत गुरव समाज संघटना आजरा विभाग यांच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हरपवडे गावामध्ये ग्रामदैवत श्री रासूबाई देवीचा पूजेचा मान गुरव पुजारी याचे कडे परंपरेने चालत आला आहे. पुजारी म्हणून देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नोंद असलेला पुरावा (उतारा) अर्जासोबत जोडत आहे. मुख्यता गुरव समाजाकडे परंपरेने चालत आलेला पूजेचा मान कोणालाही दादागिरी करून घेता येणार नाही. देवालयाच्या बांधकामाच्या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत स्थापन झालेल्या उपसमिती यांना पुजाऱ्यांना हटवण्याचा कोणताही अधिकार नाही. या उलट सदर उप समितीच्या लोकांनी पदाचा गैरवापर करून जनतेचा पैशाची लूट केली असल्याचे गावात बोलले जात आहे. व तसे बोगस पावती बुके काढून गैरव्यवहार केला आहे. असे तक्रारी अर्ज वरिष्ठ कार्यालयास दिलेला आहे. त्याची चौकशी चालू आहे. ती चालू राहील परंतु दसरा सण येत्या रविवारी पासून देव बसवणे, नवरात्र उत्सव चालू होणार असून, पूजेचा मान दि १२/१०/२०२३ पर्यंत मिळावा वास्तविक या अगोदर आपणाकडे अनेक वेळा अर्ज देऊन चर्चा केली आहे. मात्र न्याय मिळाला नाही. गावात तणाव निर्माण होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत आपल्या सरकारी यंत्रणेचा योग्य न्याय मिळेल या आशेवर होतो. मात्र ज्या लोकांना पुजाऱ्यांना दमदाटी करण्याचा आगर मंदिरामध्ये पूजा करण्याचा पुजाऱ्यांना हाकलण्याचा कोणताही अधिकार नाही अशा लोकांना यंत्रणा पाठीशी घालत • आहे हे योग्य नाही. मंदिराच्या पूजेचा मान दि. १२/१०/२०२३ पर्यंत न मिळाले ना विलाजाने आम्ही तहसील कार्याल आजरा यांचे कार्यालयाचे दारात दि. १३/१०/२०२३ पासून बेमुदत घरने आ दोलन करत आहोत.. गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारी यंत्रणा जबाबदार राहील. व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कार्यालय जबाबदार राहील, याची कृपया नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर देवदास बळवंत गुरव, संजय गोमाजी गुरव, गोविंद लक्ष्मण गुरव, कॉ. शिवाजी धोंडीबा गुरव सह तालुक्यातील गुरव समाजाच्या सही आहेत सदर निवेदनाच्या प्रती (१) मा. सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर २) मा. प्रांताधिकारी सो आजरा / भुदरगड ३) मा. तहसीलदार सो आजरा ४) मा. पोलीस निरीक्षक सो आजरा १५) मा. संघटक अखिल भारतीय गुरव समाज संघटना यांना देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.