गणेशउत्सव सणाप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेत साजरा करा.🛑 उपविभागीय अधिकारी राजीव नवले. ( नवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील दुर्गामाता नवरात्र मंडळ, पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक संपन्न.) 🛑 यंदाही दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार. 👉 रवा, साखर, चणाडाळ, तेलासह दोन नव्या 👇जिन्नसांचा असणार समावेश.- राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील दुर्गामाता नवरात्री मंडळ, पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक आजरा प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात दि.१० रोजी संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी राजीव नवले होते.
प्रास्ताविक सपोनि सुनिल हारगुडे यांनी केले. यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपविभागीय अधिकारी श्री. नवले म्हणाले आजरा तालुक्यात सर्वच मंडळांनी गणेशउत्सव सण पारंपरिक वाद्यने व सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा केला त्याचप्रमाणे नवरात्र दुर्गामाता उत्सव शांततेत साजरा करावा. डॉल्बीमुक्त व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन समाजात मंडळांनी आदर्श निर्माण करावा कोणत्याही कार्यक्रमाची परवानगी न घेता कार्यक्रम घेऊ नये. किंवा नियोजन करू नये कायद्याचे पालन करावे प्रशासनाला सहकार्य करावे मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी. प्रदूषण मुक्त व डिजिटल मुक्त उत्सव साजरा करण्याकडे मंडळाने लक्ष केंद्रित करावे. व आदेशाचे उल्लंघन होणार नाही. याची काळजी घ्यावी. गरबा – रास दांडी सारखे कार्यक्रम वेळेत बंद करावे गावातील आजारी,.वयोवृद्ध नागरिकांना स्पीकर चा त्रास होणार नाही. यासाठी डॉल्बी न वापरता स्पीकरचा कमी आवाज असावा याची दक्षता घ्यावी. असे शेवटी मंडळांना मार्गदर्शन करताना श्री नवले म्हणाले. यावेळी तहसीलदार समीर माने म्हणाले आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या व नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता आहे. यासाठी दुर्गा माता मंडळ अध्यक्ष सर्व सदस्य यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी काटेकोरपणे शासन पालन करावे. सोबत तहसीलदार श्री माने यांनी काही सूचना दिल्या यामध्ये १) आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. २) गिरणी कामगार व वारसांचे फॉर्म भरण्यासाठी गारगोटी येथे मीटिंग आयोजित केली आहे. आपण फॉर्म भरून डॉक्युमेंट अपडेट करावी. ३) ई. पीक पहाणी कालावधी दोन दिवस आहे. आपली पिकाची नोंद करावी. ४) मतदानासाठी आपल्या नावाची नोंद करून डिजिटल कार्ड साठी आपल्या गावातील संबंधित बीएलओ यांना भेटून नोंद घालावी. अशा सूचना या बैठकीच्या अनुषंगाने तहसीलदार तहसीलदार श्री माने यांनी दिल्या

यावेळी आजरा पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. हारुगडे यांनी गणेश उत्सव ज्या पद्धतीने साजरा करून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला तसाच नवरात्र दुर्गामाता उत्सव मंडळाने ध्वनी प्रदूषण न करता शांततेत करावा नियमाचे उल्लंघन करू नये आपण नियमाचे उल्लगन केल्यास संबंधित मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील यासाठी गणेश उत्सव काळात कोणत्याही मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही परंपरा अखंडपणे चालू राहावी यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. असे आवाहन आवाहन सपोनि श्री हरगुडे यांनी केलै. या बैठकीचे नियोजन व स्वागत गोपनीय विभागाचे पो. कर्मचारी अनिल तराळ यांनी केले.
या दुर्गामाता उत्सव सणाच्या शांतता बैठकीसाठी आजरा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सपोनि श्री हारुगडे यांनी आभार मानले.


🔴यंदाही दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार. 👉रवा, साखर, चणाडाळ, तेलासह दोन नव्या जिन्नसांचा असणार समावेश.- राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय.
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त १०० रुपयात आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय झाला आहे. यावेळचा आनंदाचा शिधा देताना त्यामध्ये मैदा, पोह्याचा देखील समावेश केला जाणार आहे. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 🟥पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.🟥 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय ♦️दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.♦️विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ. – अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. – नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी. – इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा
