HomeUncategorizedगिरणी कामगारांचा पुनर्वसनाचा संघर्ष लढा मजबूत करू. - काॅ.ऊदय भट. ( आजऱ्यात...

गिरणी कामगारांचा पुनर्वसनाचा संघर्ष लढा मजबूत करू. – काॅ.ऊदय भट. ( आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न. )

गिरणी कामगारांचा पुनर्वसनाचा संघर्ष लढा मजबूत करू. – काॅ.ऊदय भट. – आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

इंग्रजांनी वस्त्र उद्योगासाठी मंबईत कापड गिरणी ची उभारणी केली असली तरी हक्कासाठी गिरणी कामगार संघटीतपणे सातत्याने लढत राहीला आहे.
शासनाने व्यवसायासाठी गिरणी मालकाना लिजवर मोफत जमिनी दिल्या. मुंबईतील कापड व्यवसाय भरभराटीला असताना मुंबईचे सांगाय करण्याच्या नादात गिरण व्यवसाय मोडकळीस आनून गिरणीकामगाराना देशोधडीला लावले, त्या जागेवर मालकांच्या बरोबर गिरणीकामगारांचा अधिकार हा कामगारांनी लढून मिळवलेला हक्क आहे. आम्ही गिरणीच्या जागेत खोली मागण्यासाठी लढत नसून, आमच्या हक्काच्या पुनर्वसनासाठी संघर्ष लढा देण्याचा मनोदय काॅ. ऊदय भट यांनी गिरणीकामगार मेळावात व्यक्त केला. आजरा येथील जे. पी. नाईक सभागृहात गिरणीकामगार मेळावाच्या अध्यक्ष स्थानी काॅ. अतूल दिघे होते. प्रास्ताविक व स्वागत काॅ.शांताराम पाटील यांनी केले यावेळी काॅ. ऊदय भट यांनी पुढे बोलताना म्हणाले , गिरणीकामगार आता वयस्कर झाले आहेत, काही हयातीत नाहीत , त्यांच्या वारसाना हक्क मिळणार आहे. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी ची यादी अद्ययावत करणे तसेच वारसांच्या माहिती फाॅर्म भरून घेण्यात येत आहे. राजकीय पक्षाचे वारसदार, उद्योगपती चे वारसदार मुलगा, नातू ,पंतू पुढे येत आहेत. त्या प्रमाणे मंत्री चंद्रकांत पाटील मी गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून सांगतो, तर गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य केले पाहीजे. गिरणी कामगार हा सगळ्याचा बाप आहे, तो संयुक्त महाराष्ट्र सह वेगवेगळ्या चळवळीत आघाडीवर आहे. तो जाती धर्माच्या पलिकडे लाल बावट्या मध्ये संघटित आहे.हाच आमचा मानवता धर्म आहे.
यावेळी काॅ.अतूल दिघे यांनी गावागावात गिरणी कामगारांच्या वारसाचा गृप तयार करून त्यांना गिरणीकामगार संघर्ष लढा समजून देणे आवश्यक आहे.यासाठी वारसांचे फाॅर्म भरणे सुरू आहे हा लढा आधीक तिव्र करण्यासाठी १८ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्या वर मोर्चात सामिल होण्याचे आव्हान केले. यावेळी उपस्थित शांताराम हारेर, नारायण भंडागे, निवृत्ती मिसाळ, मनप्पा बोलके, विजय पाटील, विठ्ठल बामणे, जानबा धडाम, हिंदूराव कांबळे, गोपाळ रेडेकर, आबा पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने गिरणीकामगार उपस्थित होते, आभार काॅ. संजय घाटगे यांनी मांडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.