HomeUncategorizedआजरा हायस्कूल आजरा चे शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश.

आजरा हायस्कूल आजरा चे शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश.

आजरा हायस्कूल आजरा चे शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश.

आजरा. – प्रतिनिधी.

जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूल आजरा ने शैक्षणिक वर्ष 2021 -22 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अभूतपूर्व यश मिळविले. महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व उच्च माध्यमिक (आठवी) पुणे यांच्यामार्फत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजरा हायस्कूल आजरा चे तब्बल 26विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. तालुक्यामध्ये सर्वाधिक शिष्यवृत्ती धारक विदयार्थी असण्याचा मान आजरा हायस्कूल आजरा ने पटकावला .इयत्ता पाचवी चे राज्यामध्ये दोन विद्यार्थी चमकले व इयत्ता आठवीचे राज्यामध्ये चार विद्यार्थी चमकले याबरोबरच जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवी चे सात व इयत्ता आठवीचे 19 विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता पाचवी प्रशांत प्रदीप पारपोलकर गुण (290) राज्यात 4 था , अक्षरा सर्जेराव पाटील गुण( 284) राज्यात 8 वी ,जिल्हा शिष्यवृत्तीधारक वेदिका विजय पोतदार गुण (276) 47 वी, श्रुती धनाजी कुंभार गुण(268) 84 वी, तन्मय उदयसिंग सरदेसाई गुण (268) 89 वा ,
नवेली दामोदर यादव गुण (258 ) 141 वी, अथर्व कृष्णा वांद्रे गुण (252) 189 वा याना मोलाचे मार्गदर्शन श्रीम मनिषा कांबळे , सौ वृषाली यादव, सौ. वैजयंता अडकुरकर, किरण कांबळे यांनी केले. इयत्ता आठवी. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किरण उमाजी कुंभार गुण (278) राज्यात 5 वी, सई संजय भोसले गुण (274) राज्यात 7वी , प्रेरणा बाळासो लवटे गुण (272) राज्यात 8वी ,निशांत शशिकांत सुतार गुण ( 268) राज्यात 10 वा तसेच जिल्हा शिष्यवृत्तीधारक आर्यन तुकाराम कांबळे गुण (260) 24 वा, गजाला इरफान बागवान गुण(258) 30वी, शर्वरी रवींद्र देसाई गुण (256) 36 वी, मधुरा प्रदीप पारपोलकर गुण (254) 49 वी, संचिता श्रीधर कुराडे गुण (252) 55 वी, समीर कृष्णा वरेकर गुण (250) 66वा, आदित्य बाळू येसणे गुण (248) 72 वा, अंजली महेश केसरकर गुण (242 )93 वी, सोहम सचिन इंजल गुण (240) 94 वा, वृंदा राहुल कुंभार गुण(238)106वी, संचिता संभाजी हसबे गुण (236)118 वी, श्रीशांत उदय सरदेसाई गुण (228) 139 वा, प्रथमेश वामन सामंत गुण (226) 149 वा, अभिनंदन सुभाष बुरुड गुण (224) 160 वा, हर्षवर्धन युवराज येसणे गुण (218) 199 वा यांना मोलाचे मार्गदर्शन . राहुल पाटील, सौ सुधा पाटील, सौ भाग्यश्री पाटील यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी येसणे, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण दरी, पर्यवेक्षक संभाजी होलम यांचे प्रोत्साहन मिळाले. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी सर्व संचालक यांची प्रेरणा मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.