🟣डॉ. सुमन येसणे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र (Economics) विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त.
🟣उत्तुर बस स्टँडचे काम तातडीने सुरू करा. ( कॉम्रेड शिवाजी गुरव यांची एसटी आगाराला निवेदनाद्वारे मागणी.)
🟣डॉ. सुमन येसणे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र (Economics) विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता आजरा येथील डॉ सुमन येसणे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र (Economics) विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.
डॉ सुमन त्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीचे हे यश आहे. त्यांना पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
🟣उत्तुर बस स्टँडचे रखडलेले काम तातडीने सुरू करा. ( कॉम्रेड शिवाजी गुरव यांची एसटी आगाराला निवेदनाद्वारे मागणी.)
आजरा – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील उत्तुर व परिसरातील ४० गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बस स्थानकाचे बांधकाम वर्षानुवर्षे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही परिस्थिती पाहून त्वरित बांधकाम सुरू करावे, अशी मागणी कॉम्रेड शिवाजी गुरव, यांनी एसटी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनातील प्रमुख मागण्या.
- उत्तुर बस स्टँडची इमारत ६० ते ७० वर्षे जुनी असून मोडकळीस आली आहे. छत व भिंती ढासळण्याच्या स्थितीत आहेत.
- प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व बस स्टँड एकाच ठिकाणी असल्याने रुग्ण व प्रवाशांना मोठी अडचण होते.
- काही भागातील ग्रामस्थांनी स्टँडच्या बांधकामासाठी अनेक वेळा मागणी केली आहे, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.
- शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना उन्हात-पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. तसेच “कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही काम सुरू न होणे ही गंभीर बाब आहे. फक्त तक्रार अर्जावरच कारवाई होणार असेल तर आम्ही दि. 18 ऑगस्ट 2026 पासून जुप येथे येणारे भाडे घेण्यास व हस्तलिखित आंदोलन सुरू करू.” एसटी आगार प्रशासनाने त्वरित काम ताब्यात घेऊन बस स्टँडचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
