HomeUncategorizedआजरा खानापूर प्राथमिक शाळेला. - "बेंटली सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड,पुणे" यांच्याकडून प्रोजेक्टर, कम्पुटर...

आजरा खानापूर प्राथमिक शाळेला. – “बेंटली सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड,पुणे” यांच्याकडून प्रोजेक्टर, कम्पुटर आदी ई-लर्निंगचे साहित्य भेट.

आजरा खानापूर प्राथमिक शाळेला. – “बेंटली सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड,पुणे” यांच्याकडून प्रोजेक्टर, कम्पुटर आदी ई-लर्निंगचे साहित्य भेट.

आजरा. – प्रतिनिधी.

खानापूर ता. आजरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला संदीप शिवाजी भडगावकर यांच्या सहकार्याने “बेंटली सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड,पुणे” यांच्याकडून प्रोजेक्टर, कम्पुटर आदी ई-लर्निंगचे साहित्य कंपनीचे प्रतिनिधी संदीप भडगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.जिल्हा परिषदेकडे अपुरे शिक्षक असल्याने प्रत्येक शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत.खानापुर येथेही दोन शिक्षकांपैकी मुख्याध्यापक पदावरील शिक्षक मयत झाल्याने ही जागा रिक्त आहे.त्यामुळे एका शिक्षकांवर विद्या दानाचा ताण येत आहे.अशा परिस्थितीत ई-लर्निंगचे साहित्य मिळाल्याने काही अंशी शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे. ई-लर्निंगचे साहित्य मिळाल्याने पालकवर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. याकामी माजी उपसरपंच युवराज जाधव यांनी बेंटली सिस्टीम, पुणे या कंपनीकडे पाठपुरावा केला.मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप भडगावकर,बळवंत शिंत्रे, एन.जी.गुरव, धनाजी डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्नेहा भडगावकर, बळवंत शिंत्रे सर, एन.जी.गुरव सर, ज्ञानदेव जाधव, वसंत जाधव, गौतम कांबळे सर, एकनाथ जाधव, धनाजी डोंगरे, सागर कोले, नकुशा जाधव आदी उपस्थित होते. आभार एम.व्ही.पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.