Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र मराठी तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण.- परप्रांतीय तरूणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलीसांच्या केले हवाली.

मराठी तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण.- परप्रांतीय तरूणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलीसांच्या केले हवाली.

🟥मराठी तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण.- परप्रांतीय तरूणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलीसांच्या केले हवाली.-

कल्याण :- प्रतिनिधी.

कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत या तरुणीला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याचा छडा लावण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोकुळ झा हा गायब झाला होता. कल्याण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होती. अखेर मंगळवारी रात्री नवाळी परिसरात तो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला.

गोकुळ झा याने आपली ओळख लपवण्यासाठी त्याचा लूक बदलला होता. गोपाळ झा हा नांदिवली परिसरात अनेकजण त्याला ओळखतात. मात्र, पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गोकुळ झा याने केस कापले होते. नेहमीसारखा पोशाख न करता टी-शर्ट परिधान केला होता.

नांदिवली परिसरामध्ये गोकुळ झा अनेकांच्या ओळखीचा असल्यामुळे त्याने त्याचा लुक बदलला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांपासून त्याचप्रमाणे जागरुक नागरिकांपासून आपला चेहरा लपवण्यासाठी त्याने स्वतःचा लूक बदलल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा त्याचा लुक आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरच्यालुकमध्ये फरक असल्याचे दिसून आले आहे. गोकूळ झा याला लूक बदलल्यामुळे आपण पकडले जाणार नाही, याची खात्री वाटत होती.त्यामुळे तो मंगळवारी रात्री नेवाळी परिसरात फिरत होता.

त्यावेळी मनसेच्या योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे सांगितले होते. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते दिवसभर त्याला शोधत होते. अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांनी दिसला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले. गोकुळ झा याला पोलिसांकडून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.