🛑व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिरात.- आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा..
🛑चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटरावच्या अथर्व व सिमरन या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड.
💥चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटरावच्या अथर्व व सिमरन या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड.
आजरा.- प्रतिनिधी.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर व पं .स. आजरा शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर निबंध ,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील एकूण ११ केंद्रातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरासाठी निवड करून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.. यावेळी विलास पाटील शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.आजरा, सुभाष विभुते केंद्रप्रमुख, रावसाहेब देसाई केंद्रप्रमुख, माळी सर, संजीव देसाई -मुख्याध्यापक पंडित दीनदयाळ हायस्कूल व वरील स्पर्धांचे परीक्षक उपस्थित होते…
या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे जिल्हास्तरासाठी निवड झालेले (इयत्ता आठवी ते बारावी )या गटातील यशस्वी विद्यार्थी.. वक्तृत्व स्पर्धा कुमारी सिमरन भिकाजी पाटील,( इयत्ता दहावी) आजरा तालुक्यात प्रथम, जिल्हास्तरीय निवड.. चित्रकला स्पर्धा अथर्व शांताराम नाईक.. (इयत्ता आठवी. ) आजरा तालुक्यात प्रथम व जिल्हास्तरीय निवड..वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.. व कलाशिक्षक कृष्णा दावणे, व्ही एच गवारी व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

🛑व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिरात.- आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा..
आजरा.- प्रतिनिधी.

घेता नाम विठोबाचे
परवत जळती पापांचे आजरा येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित, व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर आजरा येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती देवी चे दर्शनाने झाली त्यानंतर विठ्ठल- रखुमाई च्या पालखीचे पुजन करण्यात आले.
अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी पद्धतीने पोषाख केला होता.विद्यार्थ्यांच्या रूपाने जणू संतच अवतरले असे वाटत होते.
पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष जयवंत शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे खजिनदार सुनील पाटील
संचालक सचिन शिंपी, प्राचार्य नागूर्डेकर सर मुख्याध्यापक देसाई सर उपस्थित होते.

याचबरोबर व्यंकटराव संकुल ते विठ्ठल-रखुमाई मंदिर आजरा इथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय अश्या जयघोषाने सुरुवात करण्यात आली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या विठ्ठल रखुमाऊच्या जयघोषाने आजरा शहर दुमदुमून गेले. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवीला. रखुमा माझी पेरणी* करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती ही पंढरी अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशी अनेक भजनेदेखील म्हणण्यात आली..”बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” करावा विठ्ठल जीवे भावे. या कार्यक्रमासाठी डी .एस .बी डेळेकर सर, एन .आर. हसबे मॅडम, एल. पी .कुंभार मॅडम, एन. सी .हरेर मॅडम, आर. एच. गजरकर मॅडम, एम .व्ही. सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.