HomeUncategorizedराज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार. -शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर. ( महाराष्ट्र विधान...

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार. -शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर. ( महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर. )

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार. –
शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर.
( महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर. )

मुंबई – प्रतिनिधी.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारीला मतदान, तर २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.

राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदार संघात कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे.

विधान परिषदेतील निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघ

विक्रम काळे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

रणजित पाटील, अमरावती पदवीधर मतदारसंघ

बाळाराम पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघ

नागो गाणार, नागपूर शिक्षक मतदार संघ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.