Homeकोंकण - ठाणेब्लड शुगर कधीच वाढणार नाही! - हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा दूर होईल!!...

ब्लड शुगर कधीच वाढणार नाही! – हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा दूर होईल!! – पावसाळ्यात फक्त आठवड्यातून एकदा कर्टुले भाजीचं सेवन करा!!!

🟥ब्लड शुगर कधीच वाढणार नाही! – हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा दूर होईल!! – पावसाळ्यात फक्त आठवड्यातून एकदा कर्टुले भाजीचं सेवन करा!!!

मुंबई :- प्रतिनिधी

पावसाळ्यात सर्दी, खोकला व अ‍ॅलर्जी यांसारख्या समस्या सामान्य असतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात अन्नाची खूप काळजी घ्यावी लागते. कारण- थोडासा निष्काळजीपणादेखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, ज्यामुळे हळूहळू अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्यात कर्टुलेची भाजी आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. तिच्या सेवनाने आरोग्याला फायदा होतो. कर्टुलेमध्ये अँटी-अॅलर्जी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात, जे अॅलर्जीसारख्या समस्या टाळण्यास मदत करतात. वाराणसीचे अ‍ॅक्युप्रेशर तज्ज्ञ व आयुर्वेदाचार्य अनिरुद्ध पांडे यांनी कर्टुल्याचे फायदे स्पष्ट केले आहेत.

🟥कर्टुलेचे फायदे

कर्टुल्याची भाजी हे जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात विशेषतः व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, लोह, कॅल्शियम व फायबर भरपूर प्रमाणात असते. त्याशिवाय त्यात फेनॉलिक संयुगे व फ्लेवोनॉइड्स यांसारखी शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात.

👉आयुर्वेदाचार्य अनिरुद्ध पांडे यांच्या मते, कारल्याची चव खूप कडू असल्याने बरेच लोक कारल्याचे सेवन करण्यापासून दूर राहतात. त्याचप्रमाणे कारल्यासारखी दिसणारी कर्टुल्याची भाजी खूप कमी लोकांना खायला आवडते. परंतु, लोकांना हे माहीत नाही की, कर्टुलेदेखील कारल्याप्रमाणेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी कर्टुलेची चव मात्र कडू नसून, गोड असते आणि ती आपल्याला अनेक आजारांपासूनदेखील वाचवते.

🔴रक्तदाब नियंत्रण

कर्टुलेमध्ये पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

🟥साखर नियंत्रण

कर्टुले मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले वनस्पती इन्सुलिन आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. उच्च फायबर सामग्री आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि त्यामुळे पचनसंस्था सुधारते.

🔴हृदय आणि मूत्रपिंडांचे आरोग्य वाढवते

एनआयएचच्या आणखी एका अभ्यासात असे म्हटले आहे की, कर्टुल्यामध्ये नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो, जो जास्त द्रव बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तदाब कमी आणि मूत्रपिंडांवरील ताण कमी होऊ शकतो. संशोधनात असेही सूचित केले गेलेय की, ते कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. तसेच, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखमीचे घटक कमी करून, हृदयासाठी अतिरिक्त संरक्षण प्रदान करते.

🅾️👉वजन घटवण्यास उपयुक्त

कर्टुले ही कमी कॅलरीज असलेली भाजी आहे आणि त्यात भरपूर फायबर असते. फायबरमुळे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे खाण्याची अनावर होणारी इच्छा आणि जास्त खाणे टाळण्यास मदत होते. मग स्वाभाविकत:च वजन कमी होण्यास मदत होते.

🟥👉कर्टुलेमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ते नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते आणि बद्धकोष्ठतेसारख्या पचन समस्यांपासून मुक्त करते. कर्टुले शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून शरीराला विषमुक्त करण्यासही मदत करते.

🔴👉रोगप्रतिकार शक्ती वाढवते

कर्टुलेमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. तसेच त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर विषाणूजन्य संसर्गांशी लढण्यासही मदत मिळते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.