🟥कोकण, विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यातील बहूतांश भागात पावसाचा जोर वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पावसाच्या सारी कोसळत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच मराठवाड्यासह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासह कोकणासह मुंबई आणि उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
🟥दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या बहुतांश भागात रात्रभर पावसाने धुवाधार बॅटिंग केली आहे. मात्र पहाटेपासून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.तर सकाळी पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे.कोकणातल्या काही भागात मात्र सरीवर सरी कोसळत असल्याचे दिसून आले आहे. तर आज देखील मुसळधार पावसाच्या इशारा हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता मुसळधार पावसामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर तिकडे पालघरला आजही येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. तर असून अधून मधून पावसाची रिपरिप देखील सुरू आहे.
🅾️दरम्यान, आज (23 जुलै) हवामान विभागाने विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी हवामान विभागाने उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवसात विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.