🛑ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
💥निधन वार्ता..
डॉ. शिवाजी कातकर पेद्रेवाडी – यांचे अल्पशा आजाराने निधन.
🛑ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.
मुंबई :- प्रतिनिधी

राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत.
बुधवारी विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली.या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याबाबत सभागृहात सवाल केला. राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्सचा विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? असा सवाल परिणय फुके यांनी केला होता. राज्यात ठिकठिकाणी ड्रग आणि अमली पदार्थांची तस्करी होतेय. यावर शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ड्रग्सची तस्करी रोखण्यसााठी टास्क फोर्स केली होती त्याच काय झालं? असा सवाल फुके यांनी केला होता.त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. ड्रग तस्करी संदर्भात मकोका लावत येईल का? यावर आपण या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात आपण बदल करून ड्रग तस्करी करणाऱ्यावर मकोका लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
🔴शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही यावर सवाल केला. इतर राज्यातून देखील अंमली पदार्थांची तस्करी होतेय. मध्यप्रदेश, गुजरातमधून जळगाव मुक्ताई नगर येथे आणि मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवर अफू आणि गांजाची तस्करी होतेय, याकडे खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. बॉर्डवर काही राज्यात भांगला परवानगी आहे. आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
निधन वार्ता..
डॉ. शिवाजी कातकर पेद्रेवाडी – यांचे अल्पशा आजाराने निधन.
आजरा.- प्रतिनिधी.

डॉ. शिवाजी कातकर पेद्रेवाडी ता. आजरा येथील डॉ. शिवाजी उर्फ अविनाश भाऊसाहेब कातकर( वय ७२) वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. . त्यांच्या पश्चात मुलगा सुन नातवंडे व दोन भाऊ असा परिवार आहे,.अशोक कातकर यांचे ते बंधु होत. दिवस कार्य 11जुलै रोजी पेद्रेवाडी येथे आहे.ते उल्हासनगर जि. ठाणे येथील शांतीनगर येथे डॉक्टरी सेवा बजावीत होते..