HomeUncategorizedहे तर लोकशाहीला घातक. -महापालिकेतील पक्ष कार्यालय सील करण्याविरोधात शिवसेनेचे आयुक्तांना पत्र.

हे तर लोकशाहीला घातक. -महापालिकेतील पक्ष कार्यालय सील करण्याविरोधात शिवसेनेचे आयुक्तांना पत्र.

‘हे तर लोकशाहीला घातक. –
महापालिकेतील पक्ष कार्यालय सील करण्याविरोधात शिवसेनेचे आयुक्तांना पत्र.

मुंबई – प्रतिनिधी.

शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात शिंदे गटाने बुधवारी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान गुरुवारी सकाळी पालिका प्रशासनाकडून महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहेत. त्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज आंदोलन केले. त्यासोबतच आंदोलकांकडून महापालिका आयुक्तांना विनंती पत्रही देण्यात आले आहे. अशा प्रकारे पक्षकार्यालये सील करणे आणि एकतर्फी निर्णय घेणे हे लोकशाहीला धोकादायक असल्याचं सांगत जनहिताची कामे करणाऱ्या शिवसेना पक्षकार्यालय नगरसेवकांसाठी खुले करावे अशी विनंती करणारे पत्र आंदोलक शिवसैनिकांनी महापालिका आयुक्तांना लिहिले आहे.
‘आम्ही नगरसेक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपणास निदर्शनास आणू इच्छितो की दि. 29 डिसेंबर रोजी शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेच्या पक्षकार्यालात जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता गेले असता पक्ष कार्यालयाला महापालिकेने सील केलेले आढळले. खरे पाहता लोकशाहीला घातक असे हे कृ्त्य आहे. मुंबईत नगरसेवकांना पक्षकार्यालयात येण्यास मज्जाव करणे म्हणजे आपण करत असलेला हा एकतर्फी निर्णय महापालिकेच्या कोणत्याही नियमात-कायद्यात बसत नाही, असे या नगरसेवकांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कृपया, आपण शिवसेनेचे पक्षकार्यालय त्वरित सुरू करून आम्हा नगरसेवकांना जनतेच्या हिताकरता कामकाज करू द्या, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.