HomeUncategorizedप्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे HPV लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे HPV लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे HPV लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.

आजरा.- प्रतिनिधी.

मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या HPV लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ दि. १३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथे नुतन पेरणोला जि. प. सदस्य सुधीर देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपसभापती सौ.यशोदा पोवार पंचायत समिती आजरा सदस्य समीर पारधे, माजी सभापती अल्बर्ट डिसोजा डॉ.श्री.आर. जी. गुरव सर (तालुका आरोग्य अधिकारी) तसेच डॉ.शेख (वैद्यकीय अधिकारी ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर. जी.गुरव यांनी मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने HPV लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींना वेळेत लस देण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या या उपक्रमामुळे मुलींच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कोळेकर यांनी केले. कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गुरव यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.