ज्या ग्राहकांकडे हे कनेक्शन 👇 आहे. – त्यांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही.- केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय.- अधिक पहा..
नवी दिल्लीः- वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती गॅस वापराबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या ग्राहकांकडे पाइप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाही. तसेच अशा ग्राहकांना नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यास किंवा सिलेंडर रिफिल मिळवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार, ज्यांच्याकडे सध्या पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी त्यापैकी एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे. तसेच अशा ग्राहकांनी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या किंवा त्यांच्या वितरकांकडून एलपीजी सिलेंडरचे रिफिलही घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने हा निर्णय एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेशामध्ये सुधारणा करत घेतला आहे. सुधारित नियमांनुसार, ज्या घरांमध्ये पाइपद्वारे नैसर्गिक वायूचे कनेक्शन उपलब्ध आहे, त्या घरांना घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यास परवानगी राहणार नाही.
अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पीएनजी कनेक्शन असलेल्या व्यक्तींना घरगुती एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाही किंवा सरकारी तेल कंपन्यांकडून त्याचे रिफिल घेता येणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन पुरवठ्यावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे इंधन व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
