Home Uncategorized वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी – अनिल फडके यांची बिनविरोध निवड.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी – अनिल फडके यांची बिनविरोध निवड.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी – अनिल फडके यांची बिनविरोध निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये रिक्त असलेल्या व्हा. चेअरमन या पदावर कारखान्याचे संचालक अनिल फडके रा. सुळे यांची बिनविरोध निवड झाली. सदरची सभा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापुर यांचे प्रतिनिधी .जी.जी.मावळे, यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाईस चेअरमन पदासाठी श्री.‌फडके यांचे नांव माजी उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी सुचविले त्यास संचालक मारूती घोरपडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन. मुकुंदराव देसाई, यांनी आपल्या मनोगतात ना .हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ एकमताने काम करीत असुन यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून कारखाना यशस्वीपणे चालविणेसाठी प्रयत्न राहतील असे सांगीतले तर माजी व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांनी ना. हसन मुश्रीफ व संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी यांनी व्हाईस चेअरमन पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबदद्ल आभार व्यक्त केले. नुतन उपाध्यक्षपदी श्री फडके यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी वेळ देवुन काम करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णु केसरकर उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, संभाजी पाटील आजरा, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई व कार्यकारी संचालक संभाजी सावंत, प्रादेशिक ऑफीसचे कार्यालय अधिक्षक दिगंबर पाटील व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.