HomeUncategorizedजागतिक ग्राहक दिन.- तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना माहिती द्यावी.- तहसीलदार समीर...

जागतिक ग्राहक दिन.- तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना माहिती द्यावी.- तहसीलदार समीर माने.🟣 सिलेंडर पाहिजे तर केवायसी करा.- ग्राहकांसाठी अधिक माहिती. – ऑनलाइन गॅस टाकी मिळणार.. परंतु

🛑जागतिक ग्राहक दिन.- तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना माहिती द्यावी.- तहसीलदार समीर माने.
🟣 सिलेंडर पाहिजे तर केवायसी करा.- ग्राहकांसाठी अधिक माहिती. – ऑनलाइन गॅस टाकी मिळणार.. परंतु

💥जागतिक ग्राहक दिन.- तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना माहिती द्यावी.- तहसीलदार समीर माने.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे २०२६ वर्षात १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन आहे. परंतु या दिवशी सुट्टी असल्याने दि. १८ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय आजरा येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करणे करता आजरा तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपल्या विभागाची माहिती नागरिकांना देण्यात यावी ग्राहकांचे हक्क, सुरक्षितता आणि जागरूकतेबद्दल माहिती देणे, तसेच चुकीच्या व्यापारी प्रथांविरुद्ध आवाज उठवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांना अधिकृत मान्यता दिली होती, या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस साजरा होतो. यासाठी सदर कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित रहावे याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

🟣 सिलेंडर पाहिजे तर केवायसी करा.- ग्राहकांसाठी अधिक माहिती. – ऑनलाइन गॅस टाकी मिळणार.. परंतु 👇

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस वितरण ( भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम ) व रवळनाथ इंडियन आजरा ग्राहकांनी आपले इंडियन गॅस टाकीचे ऑनलाईन बुकिंग साठी प्रथम केवायसी करणे गरजेचे आहे. ही केवायसी करण्यासाठी स्वतः ग्राहक आपले आधार कार्ड, व लिंक नंबर असलेला मोबाईल घेऊन आजरा कार्यालयात केवायसी करून घेतल्यानंतरच ऑनलाईन बुकिंग करून ओटीपी आल्यानंतर आपल्याला गॅस सिलेंडर टाकी मिळणार आहे. आपल्याला गॅस टाकी मिळेल कोणताही तुटवडा नाही. आपल्या स्थानिक गॅस वितरण कंपनीमध्ये आपली केवायसी झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची गॅस टाकी मिळणार नाही तेव्हा सर्व तालुक्यातील ग्राहकांनी आजरा तालुक्यातील शिवाजीनगर मेन रोड आजरा येथील कार्यालयात जाऊन आपले केवायसी करावी असे आवाहन रवळनाथ इंडियन कार्यालयातून करण्यात आली आहे. याची नोंद घेऊन सर्वांनी आपली केवायसी करावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.