Homeकोंकण - ठाणेव्यावसाईक व घरगुती गॅसच्या तुटवड्या बाबत शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन…( शासन गॅस...

व्यावसाईक व घरगुती गॅसच्या तुटवड्या बाबत शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन…( शासन गॅस तुटवडा नाही म्हणते.- मग रांगा कशाला लागलेत.- शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. )

व्यावसाईक व घरगुती गॅसच्या तुटवड्या बाबत शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन…
( शासन गॅस तुटवडा नाही म्हणते.- मग रांगा कशाला लागलेत.- शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. )

आजरा.- प्रतिनिधी.

शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने इराणच्या विरोधात अमेरिका व इस्राइल चा देशामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशात गॅसची टंबाई वाढली आहे. त्यामुळे आजरा तालुक्यामध्ये सद्यस्थितीत घरगुती गॅस धारकांच्या रांगा गॅस एजन्सीच्या दारात लागलेल्या आहेत. दुसरीकडे केवायसी करण्याचा तगादा व काही ग्राहकांची केवायसी असूनही ऑनलाईन नंबर लागून ओटीपी येत नाही. व ओटीपी आल्याशिवाय गॅस बुक होत नाही. यामुळे सर्व सामान्य माणसांची उपासमार होऊन हाल होत आहेत. तर दुसरीकडे हॉटेल व्यावसाईक, अन्य पदार्थ तयार करणारे व्यवसायिक यांना देखील गॅस सुविधा मिळत नसल्याने आजरा शहरासह अन्य तालुक्यामध्ये हाॅटेल व्यवसाय व अन्य बेकारी व्यवसाय बंद असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या खाद्यपदार्थ मिळणे वर होत आहे. त्यामुळे शहरात कामानिमित येणाऱ्या विध्यार्थी व नागरीकांची उपासमार होत आहे.


एकीकडे शासन गॅसचा तुटवडा नाही अशी घोषणा करत असताना दुसरीकडे गॅससाठी लागलेल्या रांगा पाहता सर्व सामान्य नागरिक व व्यावसाईक यांचे हाल होत आहे. तरी आजरा तालुक्यातील नागरिकांना वेळेत गॅसपुरवठा करून द्यावा अन्यता शासनाच्या विरोधात मोर्चा काढन्यात येईल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर
उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपतालुका प्रमुख, संजय येसादे , युवा सेना महेश पाटील, अमित गुरव सह पदाधिकारी शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.