HomeUncategorizedकागल विधानसभा २०२४ मध्ये. - जनता करेक्ट कार्यक्रम करेल. - जिल्हाध्यक्ष समरजितसिंह...

कागल विधानसभा २०२४ मध्ये. – जनता करेक्ट कार्यक्रम करेल. – जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे.( कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप अशोक अण्णांच्या पाठीशी असेल. )

कागल विधानसभा २०२४ मध्ये. – जनता करेक्ट कार्यक्रम करेल. – जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे.
( कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप अशोक अण्णांच्या पाठीशी असेल. )

आजरा. – प्रतिनिधी.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघा सह जिल्ह्यात मतदार करेक्ट कार्यक्रम करतील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष व नियोजन मंडळाचे सदस्य समरजितसिंह घाटगे. आजरा तालुक्यातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आजरा विकास आघाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि. प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
स्वागत विजयकुमार पाटील यांनी केले तर प्रास्ताविक युवा नेते नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केले. श्री. घाटगे पुढे म्हणाले केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारने अनेक योजना जनतेसाठी दिल्या आहेत. तर मागील आठ महिन्यात महाराष्ट्र सरकारने प्रलंबित योजना देऊन जनतेचे भले व विकास करण्याचा ध्यास हाती घेतला आहे.

आपण ग्रामपंचायत मध्ये निवडून आला आहात पराजय झालेल्या उमेदवारांनी खचून जाऊ नये व निवडून आलेल्या उमेदवाराने हवेत राहू नये जे लढले त्या सर्वांचे अभिनंदन.

आपण गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा काही अडचण असल्यास संपर्क करावा माहिती द्यावी. एखादें अधिकारी किंवा ग्रामसेवक कामात सहकार्य करत नसतील व अडथळा निर्माण करत असतील किंवा सरपंचांना सोबत घेऊन मनमानी कारभार करत असतील तर आम्हाला सांगा वेळ पडल्यास त्याची बदली केली जाईल. व आपल्याला हवा असलेला ग्रामसेवक दिला जाईल

या अगोदर आपण विकास काम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण लोकांच्या सेवेत राहावे. असे श्री घाटगे बोलताना म्हणाले.

यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व नियोजन मंडळाचे सदस्य अशोक चराटी बोलताना म्हणाले आजरा तालुका विकास आघाडीच्या मार्गदर्शनाखाली ज्या कार्यकर्त्यांना पाठीशी राहण्याचे शब्द दिला होता. त्यांच्या पाठीशी ही आघाडी राहिली व यापुढे जिथे ही आघाडी पाठशी उभी राहील तिथे विजय निश्चित असेल राजकीय दृष्ट्या आपण सर्वजण एकच आहोत. शिंपी व चराटी गट एकत्र येत आजरा विकास आघाडी स्थापन केली आहे.

ही सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी आहे. उत्तुर विभागामध्ये आपल्या आघाडीला चांगले यश मिळाले आहे.

येणाऱ्या काळात आमदार ही आपलं असेल व केंद्रात मोदी राज्यात शिंदे फडवणीस व जिल्ह्यात तुम्ही आणि आम्ही असा पुढील राजकीय प्रवास असेल थोड्या मताने पराभव झालेल्या उमेदवारांनी खचून जाऊ नये. पुन्हा कामाला लागावे.

येणाऱ्या शेतकरी संघाच्या निवडणुकीत आपण विजयी होणार आहोत ५० ठराव हे आपल्या गटाचे आहेत. पण १०० रुपयाचा शेअर्स असणाऱ्या सभासद मतदारांना मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. व ५०० रुपये सभासद असलेल्या मतदाराला मतदानाचा अधिकार असणार आहे. याबाबतचे जे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत. ते हाणून पाडले जातील आजरा विकास आघाडी सभासदांच्या पाठीश असेल नियोजन मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला दहा लाख रुपये देण्याचे नियोजन तर डी पी टी सी मधून दहा लाख रुपये ग्रामपंचायतीच्या विकासासाठी देणार असल्याचे श्री चराटी यांनी या सत्कार सोहळा प्रसंगी मत व्यक्त केले.

यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष. जयवंतराव शिंपी म्हणाले आजरा तालुक्यातील ७२ ग्रामपंचायती पैकी सद्या निवडणूक झालेल्या व यापूर्वी च्या अशा एकूण ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायत या आजरा विकास आघाडीच्या आहेत.
आजरा तालुक्याचे नाव जिल्ह्यात सुवर्ण अक्षराने लिहिले पाहिजे असा कारभार भविष्यात या आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या आघाडीच्या मार्गदर्शनाखाली जे नूतन सरपंच व सदस्य विजयी झालेत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत व गावच्या विकासासाठी प्रयत्न करूया असे श्री. शिंपी म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर नगरसेवक विलास नाईक, जि. प. सदस्य सुनिता रेडेकर, युवा नेते अनिकेत चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष रमेश कुरुनकर, कारखाना उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक तानाजी देसाई, भाजप पदाधिकारी अतिश कुमार देसाई तसेच जनार्धन निऊगरे सह आजरा नगरपंचायत नगरसेविका, नगरसेवक तसेच आजरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायत नूतन सरपंच व सदस्य सह आजरा विकास आघाडी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार विलास नाईक यांनी मांनले
.

यावेळी तालुक्यातील सर्व नूतन सरपंच सदस्य यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. २७ गावातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.