आजरा कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतराव देसाई यांना आदरांजली.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार स्वर्गीय वसंतराव आबासो देसाई यांच्या सतराव्या पुण्यतिथी चा कार्यक्रम आजरा कारखाना कार्यस्थळावर समोर दिनांक २६ रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांच्या शुभहस्ते स्वर्गीय वसंतरावजी देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, मधुकर देसाई, मुकुंदराव देसाई, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, दशरथ अमृते, अनिल फडके, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक तसेच संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, सौ. सुनिता रेडेकर यांनी पुष्पहार घालून आदरांजली माहिती त्याचबरोबर कारखान्याचे संचालक व तालुक्यातील मान्यवर मंडळी तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.तानाजी भोसले सेक्रेटरी वेंकटेश ज्योती, जनरल मॅनेजर वसंतराव गुजर, प्रोडक्शन मॅनेजर अरविंद चव्हाण व इतर अधिकारी तसेच कामगार संघटनेचे प्रतिनिधी सभासद आणि कर्मचारी यांनीही स्वर्गीय वसंतरावजी देसाई यांना आदरांजली वाहिली.