HomeUncategorizedलाचलुचपत विभागाची धडक कारवाई;1 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणाचे दोन अधिकारी अटकेत.

लाचलुचपत विभागाची धडक कारवाई;1 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणाचे दोन अधिकारी अटकेत.

लाचलुचपत विभागाची धडक कारवाई;
1 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणाचे दोन अधिकारी अटकेत.

मुंबई. – प्रतिनिधी.

वीज महावितरण विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.पालघरमधील लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे. 1 लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाच लुचपत विभागाकडून दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदारांवर असलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती मिळत आहे.

पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकानं रंगे हात पकडलं आहे.एका ग्राहकाविरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल झाल्या आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी या दोघांनीही तक्रारदारांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचं सांगत ही रक्कम तडजोडीनंतर दीड लाख करण्यात आली आहे. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तशी तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा आणि पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या पथकानं महावितरण कार्यालयात सापळा रचला. तडजोड केलेल्या रक्कमेपैकी एक लाख रुपये रोख रक्कमेची लाच घेताना काल (सोमवारी) संध्याकाळी पाचच्या दरम्यान दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.वीज महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकानं ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.