HomeUncategorizedसहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक. - विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या...

सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक. – विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक. – विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नागपूर :- प्रतिनिधी.

नागपुरात शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन गाजत आहे ते अनेक कारणांवरुन, या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत. अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण सत्ताधाऱ्यांनी लावून धरले आहे. यावरुन विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरु आहे. यावर एसआयटी चौकशीचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
दरम्यान, आज अधिवेशनाचा दुसरा आठवड्या असताना तसेच आज विरोधक सीमावादावर ठराव मांडण्याच्या तयारीत असताना, आज विरोधकांनी सहाव्या दिवशी विधानभवनाच्या पाऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी केली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत, त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, नेमकं कोणत्या कारणासाठी अधिवेशन सोडून मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावे लागत आहे, यावर तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.