नवजीवन व वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या खाद्य महोत्सवास खवय्यांचा मोठा प्रतिसाद !
आजरा. – प्रतिनिधी.

येथील नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खाद्य महोत्सवात खवय्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आजरा तालुका संघाचे संचालक गणपती सांगले यांचे हस्ते खाद्य महोत्सवाचे उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच वैशाली आपटे होत्या. खाद्य महोत्सवात इयत्ता इयत्ता दुसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पकोडे, खर्डा भाकरी , डांगर – भाकर , वडे , पोहे . बिर्याणी , मिठाईचे पदार्थ . ताक .चहा आदी सह विविध पन्नास स्टॉल उभे केले होते. सकाळी सव्वा नऊ वाजता खाद्य महोत्सवास सुरुवात झाली लहान पासून मोठ्या पर्यंत असणाऱ्या असंख्य खवय्यांनी विविध पदार्यावर ताव मारला . दुपारी बारा पर्यत स्टॉल सुरु होते. या कार्यक्रमास सरपंच किरण आमणगी ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी , संजय उत्तूरकर , राजू खोराटे , लता गुरव. सुनिता हत्तरगे , सरीता करुणकर , मिलिंद कोळेकर , आशा पाटील. सुनिता केसरकर , भैरु कुंभार , अनिता घोडके , वनिता सावंत . सुधीर जाधव , वनिता आपटे , श्रीराम घोरपडे , दतात्रय इळके , आशा साळवेकर. मंगल कोरवी , दिगंबर कुंभार. सुरेखा परीट , अर्चना पाटील , रेश्मा आजगेकर. विमल कुराडे , परशराम चव्हाण , ऋषिकेश हाळवणकर , अंबिका शिंत्रे . आदीसह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्तविक वसंतराव दादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी केले . अस्मिता गुरव यांनी सुत्रसंचालन केले . नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांनी आभार मानले .
