HomeUncategorizedग्रामपंचायत रणधुमाळी.सरपंच पदासाठी टोकाची इर्षा. - मडिलगेत सरपंच चौरंगी - ग्रामपंचायत तिरंगी...

ग्रामपंचायत रणधुमाळी.सरपंच पदासाठी टोकाची इर्षा. – मडिलगेत सरपंच चौरंगी – ग्रामपंचायत तिरंगी लढत.

ग्रामपंचायत रणधुमाळी.
सरपंच पदासाठी टोकाची इर्षा. – मडिलगेत सरपंच चौरंगी – ग्रामपंचायत तिरंगी लढत.

आजरा. – प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील होऊ घातलेली २०२२ पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी तर सरपंच पदासाठी चौरंगी लढतीकडे वाटचाल शक्यता होती. अखेर सरपंच चौरंंगी तर ग्रामपंचायत तिरंगी लढत लागली आहे.
मडिलगे सह तालुक्यातील होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायत च्या निवडणूकीत पाच ग्रामपंचायत बिनविरोध होऊन ३१ ग्रामपंचायत निवडणूक. चिन्ह वाटप दि. ७ रोजी करण्यात आले. आजपासून प्रचाराला सुरवात होणार आहे. तीनही आघाड्याचे एकास एक उमेदवार असलेल्यामुळे निवडणुकीला रंगत येणार आहे. “एकला चलो रे” अशीच तीनही समूहातील कार्यकर्ते यांचे मत असल्याचे चर्चेत होते. त्या पद्धतीने कोणत्याही गटाची एकमेकाची तडजोड न झाल्यामुळे अखेर तिरंगी लढत लागली आहे.
यामध्ये बाजी कोण मारेल व कोणते गट एकत्र येतील हे माघार पूर्वीच स्पष्ट होईल असे वाटले होते. पण तसे न होता. सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार आनंदा घाटगे यांना हनुमान समुहाने सदस्य पदाची देखील उमेदवारी नाकारल्यामुळे श्री घाटगे यांनी थेट सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने सरपंच पदाच्या लढतींमध्ये काटे की टक्कर होणार आहे. असे बोलले जाते.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये दोन गट यांच्या गटातील सरपंच पदाचा अपक्ष उमेदवार यामुळे मताची विभागणी होऊन कदाचित तिसऱ्या आघाडीतील सरपंच व सदस्यांना फायदा होईल का.? अशी शक्यताही नाकारता येणार नाही.
परंतु या गावात कोणत्याही पक्षाच्या नावावर लढत होत नसून गावातील गटाच्या माध्यमातून लढत होत आहे. यामुळे यानंतर देखील ग्रामपंचायत लढत विरोधात जरी असली तरी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत हे परस्पर विरोधी लढणारे गट एकत्र येऊन देखील पक्षाच्या उमेदवाराला मदत करू शकतात. कारण मुळात ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक गटातटाच्या राजकारणात प्रत्यक्षात निवडणुकीला सामोरे जात असतात.

सरपंच पद आमच्या गटाकडे पाहिजे यामुळे एकला चलो रे हीच भूमिका प्रत्येक समूहाने घेतली आहे. यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाणार आहे.

सरपंच पदाचे उमेदवार.
१) के. व्ही येसणे. हनुमान समुह २) मारुती येसणे. – लोकमान्य समुह ३) बापू निऊगरे भावेश्वरी समुह ४ ) आनंदा घाटगे – अपक्ष .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.