HomeUncategorizedहातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांचा मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांचा मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश. – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक लाखांपेक्षा जास्त मतं

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांचा मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश. – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक लाखांपेक्षा जास्त मतं

कोल्हापूर. – प्रतिनिधी.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीसंदर्भातील चर्चा असताना वंचितला मोठा धक्का बसला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवलेल्या उमेदवारानं पक्षाची साथ सोडतं ठाकरे गटात प्रवेश दिला आहे.
राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा रंगत असताना मात्र कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.’मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.अस्लम सय्यद यांनी २०१९ च्या हातकणंगले लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांनी तब्बल एक लाख २५ हजार मते घेतली होती. राजू शेट्टी यांना पराभव करण्यात आणि धैर्यशील माने यांच्या विजयात हाजी असलम सय्यद यांना मिळालेल्या मतांच कारण होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का सहन करावा लागला. या राजकीय भूकंपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले धैर्यशील माने यांनी शिंदे सोबत गेल्याने आक्रमक झालेले ठाकरे गटा कडून धैर्यशील माने यांना येत्या निवडणुकीत कट्टर प्रतिस्पर्धी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आता शिवसेनेला एक मजबूत दावेदार मिळाला असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे २०१९ मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांना त्यांच्या गटात सामील करून घेतले आहे. त्यांचा शिवसेना प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारो मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत व शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आपणही प्रवेश केल्याचे सय्यद यांनी सांगितले.
शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आसिफ सौदागर, संतोष शिंदे, मोहसीन मुल्लानी, फिरोझ महात, यासीन पठाण, साकिद पठाण, आदी उपस्थित होते. हाजी अस्लम सय्यद हे वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहून त्यांनी सव्वा लाखांवर मते मिळवली होती. त्यानंतर हाजी अस्लम चर्चेत आले होते. हाजी अस्लम यांची लोकसभेतील कामगिरी अनपेक्षित होती.त्यांना मिळालेल्या मतांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पडले, असे मानले जात होत.मात्र, हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आता वाढली आहे
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.