पेरणोली-देवकांडगाव महामंडळाच्या एस. टी फेरित बदल करा – अन्यथा एसटी बंद आंदोलनाचा इशारा.
आजरा. – प्रतिनिधी.
पेरणोली- देवकांडगाव या मार्गावरील अनियमित बसफे-यामूळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवतींना शैक्षणीक नूकसानीसह शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. सोमवारपासून वेळेत व जादा बस न सोडल्यास एस टी बंद आंदोलन करण्याचा इशारा युवा भारत सामाजिक संघटनेच्यावतीने आगारप्रमूखांना निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे. कि पेरणोली देवकांडगाव, हरपवडे, कोरीवडे, साळगाव या गावी सोडण्यात येणाऱ्या एसटी सेवेच्या वेळा योग्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नूकसानीसह दिवसभर उपाशीपोटी रहावे लागत आहे.सकाळी ७ वाजता निघालेले विद्यार्थी रात्री ८वाजता घरी पोहोचतात.त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान यावेळी आगार प्रमूख पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शासनाने आजरा आगाराच्या ४४ पैकी ९ गाड्या कमी केल्याने शिल्लक ३५ गाड्यांचे नियोजन करताना कसरत करावी लागत असून ऊसवाहतूकीमूळे विलंब होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र सोमवारपासून पेरणोलीसाठी सकाळी ७ व संध्याकाळी ६ वाजता नवीन बस सुरू करणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.यावेळी झालेल्या चर्चेत कृष्णा सावंत, रामचंद्र हळवणकर,मयुरेश देसाई, महेश देसाई,स्वप्निल सावंत,सत्यम गुरव,संकेत दळवी,बजरंग कळेकर, हेमंत चव्हाण,निलेश जोशिलकर, गोविंद दारूडकर,शैलेश जाधव आदींनी विद्यार्थ्यांच्या हालआपेष्टा व गैरसोयीची माहिती दिली. निवेदनावर अध्यक्ष पंकज देसाई, दयानंद सासूलकर, डॉ. भगवान पाटील, बजरंग सुतार,रामदास कोडक,महादेव सावंत,निहाल मुल्ला, सात्विक गुरव,प्रफुल्ल माडभगत,शिवाजी वंजारे,सागर कोडक,साहिल लोखंडे, ज्ञानेश्वर हळवणकर,कौस्तुभ सावंत,बाबूराव जोशिलकर आदींच्या सह्या आहेत.