गावच्या विकासासाठी लोकमान्य आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदार विजयी करतील – मडिलगे लोकमान्य समुह प्रमुख जर्नादन निऊगरे.
आजरा. – प्रतिनिधी. ०५
गावच्या विकासासाठी लोकमान्य आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदार विजयी करतील असे मत मडिलगे ग्रामपंचायत निवडणूक ग्रामदैवत श्री.भावेश्वरी मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवताना लोकमान्य समुह प्रमुख जर्नादन निऊगरे मंगळावर दि. ५ रोजी मडिलगे ता. आजरा येथे बोलत होते. स्वागत मनसेचे वसंत घाटगे यांनी केले. पुढे श्री. निऊगरे म्हणाले आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आम्ही गावच्या विकासासाठी हा लढा देत आहोत. हि निवडणूक जनशक्ती विरोधात धनशक्ती आहे. मागील पाच वर्षात जी कामे केली ती गावासाठी निस्वार्थीपणे सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य म्हणून कार्य केले यामध्ये राजकारण केले नाही. वेगवेगळ्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवून त्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ दिला लोकांची कामे करून आम्ही आपल्याकडे मते मागण्यासाठी आलो आहोत. सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली, दूध संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना चांगला बोनस दिला. म्हणून आज आपल्याकडे हक्काने मते मारण्यासाठी येत आहोत. आपल्या लोकमान्य आघाडीतील सर्व उमेदवारांना आपण सर्व मतदारांनी विजय करावे. सर्व कार्यकर्ते उमेदवार यांनी शांततेत मतदारांना आपल्या आघाडीची भुमिका सांगुन मतदान करण्यास विनंती करावी. असे श्री निऊगरे म्हणाले.
यावेळी परुळेकर सर म्हणाले मागील निवडणुकीमध्ये झालेला समझोता झाला. पण काही जागेवर निवडणुका लागल्या पण २०२२ मध्ये असा प्रस्ताव कोणत्याही गटाकडून आला नाही. तुमची पाच वर्ष आमची पाच अशी विभागणी करुन गावची दिशाभूल करत आहेत.
आम्ही गावच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. यासाठी प्रचार शांततेत करुया व निवडणुकीला सामोरे जाऊया असे श्री परुळेकर म्हणाले.
यावेळी केरबा पाटील, जालिंदर येसणे, संजय घंट्टे, आनंदा घंट्टे, गणपती येसणे, कृष्णा हासबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी लोकमान्य समुहाचे सर्व संचालक, पदाधिकारी मनसे, शिवसेना, भाजपचे सर्व पदाधिकारी, सर्व उमेदवार उपस्थित होते. मनसे ता. अध्यक्ष व उमेदवार अनिल निऊगरे यांनी आभार मानले.
( भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.)