Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रएक दिवस बळीराजासाठी योजने अंतर्गत हारूर येथे वृक्षारोपण.🛑 कानोलीत शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.

एक दिवस बळीराजासाठी योजने अंतर्गत हारूर येथे वृक्षारोपण.🛑 कानोलीत शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.

🛑एक दिवस बळीराजासाठी योजने अंतर्गत हारूर येथे वृक्षारोपण.
🛑 कानोलीत शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.

🌴एक दिवस बळीराजासाठी योजने अंतर्गत हारूर येथे वृक्षारोपण.

आजरा.- प्रतिनिधी

संवेदना फलोद्यान हारूर येथे एक दिवस बळीराजा साठी योजनेअंतर्गत पंचायत समिती आजरा चे गटविकास अधिकारी सुभाष सावंत साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी पुजारी saheb विस्ताराधिकारी बी. टी. कुंभार साहेब यांची भेट व वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कानोली – हारूर च्या सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील होत्या यावेळी अधिकारी यांनी कामकाजाची पाहणी केली.

संवेदना फाउंडेशनच्या वतीने हारूर येथील संवेदना फलोद्यान मधील त्यांनी वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, कुंपण, स्वच्छता आणि देखभाल यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी त्यांनी ग्रामस्थ आणि संवेदना फाउंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधून फलोद्यान अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. वृक्षसंवर्धन, नियमित पाणीपुरवठा आणि स्थानिक सहभाग वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्नेहदीप सरदेसाई ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल आर्दाळकर, यांच्यासह

गावातील विलाससुतार , सयाजी सावंत, अमोल रेडेकर, अमर आर्दाळकर , सचिन नलवडे, दिग्विजय भोसले साहिल पाथरवट आणि स्थानिक संवेदना सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

🛑 कानोलीत शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.

आजरा.- प्रतिनिधी.

कानोली (ता. आजरा ) येथील अर्जुन आपा पाटील ( वय ७७) यांचा शेताकडे गेले असता सर्पदंशाने मृत्यू झाला. ते बुधवार दि. 22 रोजी पट्टी नावाच्या शेतात पाहण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांच्या पायाला कांहीतरी चावल्यासारखे झाले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले, घरी गेल्यावर त्यांना चक्कर आल्यासारखे वाटले त्यानंतर ते दवाखाण्यात नेले, मात्र उशीर झाल्याने.प्रकृती अधिकच बिघडली, पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे सी. पी. आर. येथे नेण्यात आले उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पश्यात पत्नी, मुलगा, चार विवाहित मुली सून नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.