Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा अर्बन बँकेचा व्यवसाय २ हजार कोटींच्या पुढे..सर्व घटकांना सोबत घेऊन बँकेची...

आजरा अर्बन बँकेचा व्यवसाय २ हजार कोटींच्या पुढे..सर्व घटकांना सोबत घेऊन बँकेची प्रगतीची वाटचाल.- चेअरमन अशोक चराटी.

आजरा अर्बन बँकेचा व्यवसाय २ हजार कोटींच्या पुढे..सर्व घटकांना सोबत घेऊन बँकेची प्रगतीची वाटचाल.- चेअरमन अशोक चराटी.

आजरा : प्रतिनिधी.

आजरा अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय २ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, सर्व घटकांना सोबत घेऊन बँकेची प्रगतीची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच बँकेने मोठी झेप घेतली असून, बँक मोठी करण्यात सर्वांचे योगदान आहे. ‘आजरा बँक म्हणजे माझी बँक’ हा विश्वास सर्वत्र निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले. ते आजरा अर्बन बँकेच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अध्यक्ष चराटी म्हणाले, सभासद व ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर बँकेने १ हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि १ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बँकेमार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बँकेला लवकरच शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे.


ग्रामीण भागातून सुरू झालेल्या आजरा अर्बन बँकेने मुंबई, पुणे, कोल्हापूरसह महत्त्वाच्या शहरांमध्ये शाखांचा विस्तार केला असून, त्यांचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे. मल्टीस्टेट बँक असलेल्या आजरा अर्बनचा लवकरच गोवा राज्यात विस्तार करण्याचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभेची नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. सभासदांच्या लेखी प्रश्नांना गंभीर यांनी उत्तरे दिली. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल अध्यक्ष अशोक चराटी तसेच स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. संदीप देशपांडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विजयकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष संजय चव्हाण, संचालक मंडळाचे सदस्य, अण्णाभाऊ संस्था समूहातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.